आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रीन इकॉनॉमी पर्यावरणाचे नवे तंत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

5 जून हा आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. यंदा ग्रीन इकॉनॉमी हा विषय आहे.
ग्रीन म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करणारा, निसर्गातील परिसंस्था जपणारा, पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांचा समतोल राखणारा घटक. आर्थिक विकासाचे प्रारूप पर्यावरणाचा -हास होऊ न देता मानवी जीवनाचा स्तर कसा उंचावता येईल याचे अर्थशास्त्र विकसित करण्याची ही संकल्पना आहे. याचा प्रमुख उद्देश असा की, चांगले, सुसह्य जीवन या पृथ्वीतलावर निर्माण करणे. आता रिओ प्लस 20 ही परिषद भरणार आहे. ग्रीन हाऊस वायूंमुळे होणारे ग्लोबल वॉर्मिंग, ओझोनच्या थराचा -हास अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या अतिरेकामुळे जीवसृष्टीवर होणारे परिणाम, नष्ट होत जाणारे पारंपरिक ऊर्जास्रोत, जैवविविधतेचा झपाट्याने होत जाणारा -हास. यास ग्रीन इकॉनॉमी तंत्रात उत्तर आहे.
ग्रीन इकॉनॉमी तंत्रातील उत्तर
जीवसृष्टीला कशामुळे धोका आहे याची कारणे समजून घेऊन प्रामुख्याने स्वच्छ तंत्रज्ञानाचा विकास सर्वच क्षेत्रात करावा लागेल. उद्योगाच्या उभारणीत पर्यावरण संतुलनाचा मुद्दा ठेवून प्रयत्नपूर्वक ग्रीन इकॉनॉमीत सहभागी करून घ्यावे लागेल. यात पर्यावरणाचे आॅडिट, पाण्याचे बजेटिंग हे अनिवार्य आहे. ग्रीन इकॉनॉमीद्वारा भरपूर बचत करणा-या काही उद्योगाची उदाहरणे आहेतच.
काय आहे नवी औद्योगिक क्रांती ?
कोळसा, लाकूड आणि नैसर्गिक वायूचा वापर बंद करून अणू, सूर्य, वारा, समुद्रलाटा, बायोगॅस असे ऊर्जेचे स्रोत वापरात आणावे लागतील. स्वच्छ व अखंड ऊर्जा, शाश्वत विकास आणि दारिद्र्य निर्मूलन ही या अर्थव्यवस्थेची फलिते असतील. जैवविविधतेचा विकास आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जीवांना संरक्षण हे या ग्रीन इकॉनॉमी टेक्निकचे फलित असेल. शेतीत रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर टाळून गांडूळ खतनिर्मिती, जैवकीटकनाशके यांची औद्योगिक पातळीवर निर्मिती करावी लागेल.
मिनिएचरायझेशन तंत्र
एखादा मोठा रासायनिक कारखाना चक्क 25 फूट गुणिले 25 फूटच्या खोलीत उभा करून शून्य प्रदूषण तंत्रज्ञान पुण्याच्या राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत (एनसीएल) विकसित होत आहे. या मिनिएचरायझेशन तंत्रामुळे कल्पनातीत अशी औद्योगिक क्रांती होऊ घातली आहे. खेडेगावातील महिलांचे आरोग्य पारंपरिक चुलींमुळे धोक्यात असते. बायोगॅस तंत्रज्ञानामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. शुद्ध पिण्याचे पाणी, हगणदारी व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान विकसनशील राष्ट्रांनी प्रामाणिकपणे अंगीकारल्याशिवाय सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न सुटणार नाही, तर मानवाच्या विविध अंगाना स्पर्श करून जाणारी ही औद्योगिक क्रांती असेल. हाच ग्रीन इकॉनॉमीचा पाया आहे.
ग्रीन इकॉनॉमीचे वेगळेपण
एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (एचडीआय) किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (जीडीपी) या परिमाणात मोजली जाते. भूतान या राष्ट्राने मात्र ग्रॉस नॅशनल हॅप्पीनेस (जीएनएच) हे क्रांतिकारी असे नवे परिमाण ठरवले असून त्यात शिक्षण, आरोग्य, निवारा, सुरक्षा आणि पैशाचे मूल्यवर्धन या घटकांचा विचार केलाय. याचा जागतिक विचार होत आहे.
भारतीय ग्रीन इकॉनामी तंत्र
भारताने ग्रीन जॉब्ज, ग्रीन बिझनेस, ग्रीन शिक्षण, लो-कार्बन इकॉनॉमी, कार्बन फुटप्रिंट या संकल्पना स्वीकारलेल्या आहेत.

लेखिका औरंगाबाद मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्ष आहेत.