आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिभ्रंश-डिमेन्शियाचे तीस लाखांवर रूग्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण आरोग्यासाठी शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्याचा विचार करावा लागेल. मानसिक आजाराबद्दल फारच कमी ज्ञान व अनेक गैरसमज समाजात पसरलेले दिसतात. मानसिक आजाराची व्याख्या करायची झाल्यास मनामुळे निर्माण झालेले शारीरिक आजार, अशी करावी लागेल. मानसिक तणावामुळे निर्माण होणारे शारीरिक आजार- रक्तदाब (b.p.) मानसिक तणावामुळे वाढतो. रक्तातील साखर कमी जास्त होते, थायरॉइडचा आजार मानसिक तणावामुळे वाढतो. स्त्रियांमध्ये पाळी वेळेवर न येणे, पाळीत पोटात दुखणे, वगैरे समस्या मानसिक तणावामुळेच निर्माण होतात.


memory and agingही सर्वसामान्य तक्रार उतार वयात असू शकते. साधारण 75 टक्के ही तक्रार पन्नाशीनंतर असते. याला mind cognitive impaizment म्हणतात. ही साधारण मेंदूत जे phygological’ बदल होतात, ते मुख्यत: मेंदूत असणारे हार्मोन्स डोपामीन याच्या कमतरतेमुळे होतात. दुसरे काही मेंदूचे आजार किंवा औषधांचा सतत वापर यामुळे विस्मरण घडत असते. याचे प्रकार दोन 1. शॉर्ट टर्म (shurt term)व लॅँग टर्म (long term) यात लॉँग टर्म ही वयाप्रमाणे असते, पण डोपामीन हार्मोनचे कमी झालेल्या हार्मोन लेव्हलमुळे, मात्र ब-याच अडचणी येतात. माणसाच्या मेंदूमध्ये 90 लाख कोटी मेंदूपेशी असतात.मेंदूची प्रमुख रसायने हार्मोन्स आहेत- अ‍ॅड्रिनलीन, नॉरअ‍ॅड्रिनलीन, डोपामीन, अ‍ॅसिटीलकोलीन या शिवाय न्यूरोटेन्सिन, एनकॉफिलीन, न्यूप्रोटीन, एन्डार्फिन ही रसायनेसुद्धा कार्य करतात. वेगवेगळ्या आजारात वेगवेगळ्या रसायनाचे कार्य बिघडते. उतारवयात मेंदूमधील पेशीची संख्या कमी होत जाते. त्यामुळे आठवणीवर बिपरीत परिणाम होत जातो, यालाच स्मृतिभ्रंश वा डिमेन्शिया म्हणतात.


डिमेन्शिया, अल्झायमर यांच्या सारख्या आजाराबाबत आपल्याकडे फारसी जागृती नाही. म्हतारपण झाले की स्मरण शक्ती कमी होतेच, हे गृहीत धरून सर्व व्यवहार चालतात, पण डिमेन्शिया ह्या आजाराची लक्षणे दिसल्यास आपण स्वत:ला आपल्या मुलांनी ज्येष्ठांना डॉक्टरकडे नेणे गरजेचे आहे. स्मृतिभ्रंश(डिमेन्शिया) या आजारात मेंदूची कार्यक्षमता कमी होते. यात स्मरणशक्ती बुद्धिमता, एकाग्रता, भाषाकौशल्य व स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता मुख्यत: कमी होते. पेशंटची वर्तणूक व स्वभावातही बरेच बदल दिसतात. यात चिडचिडपणा, हिंसक प्रवृत्ती, हट्टीपणा, दुर्लक्षिले गेल्याची भावना व त्यातून येणारे नैराश्य, आजाराच्या पुढच्या अवस्थेत किंवा उपचाराअभावी पेशंटला भास होणे, भ्रम होणे, झोपेचे वेळापत्रक बदलणे इत्यादी लक्षणे दिसतात.


साठीनंतर मेंदूच्या कार्याचा हळूहळू -हास होत जातो. यात प्रामुख्याने मेंदूची महत्त्वाची कार्य स्मरणशक्ती बुद्धिमता, हातापायाची हालचाल, रोजची कामे याचा विसर पडत जाणे, या सर्व गोष्टी हळूहळू वाढत जातात. निर्णयक्षमता कमी कमी होणे, कपाळावर असलेला चष्मा बाहेर शोधीत बसणे, मेंदूतील पेशी एकदा नाश पावल्या की पुन: त्यामुळे बुद्धीचा -हास होत जातो. पुढील काळात तर लघवी, संडास यावरील नियंत्रणही जाते. पेशंट स्वत:लाही ओळखत नाही. देवळात जायला निघाल्यास आपणाला कोठे जायचे याचा विसर पडून रस्त्यातच उभा राहतो. ही स्टेज म्हणजे अल्झायमर होय. vascular डिमेन्शियामध्ये मेंदूकडे रक्त पुरवठा कमी झाल्याने काही वेळा पक्षाघातसारखा आजारही होऊ शकतो.
थोडी चिंता असावी, अतिरेकी चिंतातुर स्थिती नको. आरोग्य संपन्न जीवन म्हणजेच चिंतेतून मुक्ती. चिंतेतून मुक्त होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नाची दिशा म्हणजे स्वत:ला गुंतून ठेवणे, आवडीच्या कामात. सकाळ-संध्याकाळ शेजारच्या गार्डनमध्ये जाऊन योगा करणे, ओळखी वाढवून मित्र परिवारांत वेळ घालवणे. यामुळे कुठल्याही विचाराला थारा मिळणार नाही व आयुष्य सुखकर होईल.


चिंताग्रस्ताचा विकार जडला आहे का? पडताळून पाहण्यासाठी खालील प्रश्नाची उतरे शोधा.
लक्ष केंद्रित करणे किंवा एकाग्र करणे तुम्हाला जड जाते का?, सभोवताली बरीच माणसे असल्यास तुम्हावर दडपण येते का? , तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त राग येतो का?, सातत्याने तणावाची किंवा कडेलोट झाल्याची तुमची भावना असते का?, निर्णय घेण्यास तुम्हाला भीती वाटते का? हे सगळे होते याचे कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आणि कार्य पद्धतीत आहे. कोणत्या समस्येला तोंड देण्याचे कार्य मेंदू करतो. या प्रक्रियेत प्रामुख्याने आपल्या अनैच्छिक मज्जा संस्थेतील सिपथॅटिक नव्ह्स सिस्टिम भाग घेते. यामुळे बाहुल्या रुंदावतात, श्रवण सक्षम होते. लाळ व पाचक रसाची निर्मिती थांबते, श्वासनलिका रुंदावतात, नाडीची गती जलद होते. श्वास जलद व खोल होऊ लागतो. भूक मंदावते, आतड्याचे स्नायू संथावतात. जाग येते, वदना तीव्र होते. मन एकाग्र होऊ शकत नाही. मनात बेचैनी, अवस्थता व भीतीची भावना येते. यासाठी प्रथम आपल्या शरीराची विशेषत: मेंदूची आरोग्य स्थिती चांगली असावयास हवी. आहार सकस व संतुलित असला तरच मेंदूच्या सर्व पेशींना आवश्यक जीवनसत्त्वे, क्षार व महत्त्वाचे घटक मिळू शकतील. विविध तृणधान्य, मोड आलेले कडधान्य, सर्व भाज्या, कोशिबीरी, दुध दुबते, ऋतुमानाप्रमाणे फलहार, आवश्यक तेवढेच मीठ व मसाले, मर्यादित तेल, तुप असावे, गोड खाणे टाळावे मद्यपान -धुम्रपान तर मेंदूसाठी कटाक्षाने टाळावेत नियमित व्यायाम, योगा, कमीत कमी 3 किलोमीटर पायी चालणे अंतर्बाह्य स्वच्छता राखावी. मेंदूला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. शारीरिक व मानसिक स्थिती चांगली ठेवली तर सिनाइल डिमेन्शिया वा अल्झायमरसारखे आजार नक्कीच आपण दूर ठेवू शकतो.
ताणतणाव म्हणजे आयुष्यातील विविध घडामोडीमुळे झालेली माणसाच्या शरीराची व मनाची झीज.


त्यामुळे त्यांच्यात भीती, गोंधळ, नैराश्य, तणाव यासारख्या गोष्टी निर्माण् होतात, पण चाकोरीबद्ध जगण्याने त्या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नसते. त्यामुळे अशा परिस्थितीत तो पार कोलमडून जातो. तणावपूर्ण विचारात अडकून माणूस आपली इच्छाशक्तीही गमावून बसतो. माणसाने आपल्या शरीरावर, जीवनावर नियंत्रण ठेवले, सकारात्मक विचार ठेवले तरा तो त्वरित


तणावमुक्त होऊ शकतो.
उपाय होणे आवश्यक : जगभरात आज सुमारे 38 दशलक्ष व्यक्तींना या आजाराने ग्रासले आहेत. एकट्या भारतात 30 लक्षाहून अधिक स्मृतिभ्रंशाचे पेशंट आहे. या आजारात 10 टक्के लोकांना वर्तणुकीतील बदल व मनोविकृती ही लक्षणे आढळतात, तर 56 टक्के लोकांना मानसिक आजाराची लक्षणे आढळतात. त्यांच्यावर उपाय होणे आवश्यक आहे.