आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती/अभ्यासक्रम : राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग समाजकल्याण आयुक्तालयातर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाºया राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्तीची संख्या 10 असून, त्यामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी 80, पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमासाठी 16 तर पदव्युत्तर पदवी/ पदविका (राज्यस्तर) 4 याप्रमाणे शिष्यवृत्तींचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी 10 वी/ 12 वीची परीक्षा महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ अथवा महाराष्ट्र राज्यातील अन्य परीक्षा मंडळातून उत्तीर्ण झालेली असावी. पदवी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांच्या 12वीच्या परीक्षेतील व सीईटीमधील गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. या परीक्षांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांनी किमान 55% गुण मिळविणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमातील गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल व विद्यार्थ्यांनी त्यासाठी पदवी परीक्षेमध्ये किमान 50% गुण मिळविणे आवश्यक राहील. अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 4.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील : या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य व इतर शैक्षणिक खर्चापोटी दरवर्षी 10000 रु. देण्यात येतील.
याशिवाय वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व भोजनखर्च देण्यात येईल.
अर्ज व इतर माहिती : अर्जाचा नमुना आयुक्त, समाजकल्याण- महाराष्ट्र राज्य, पुणे अथवा संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग व संबंधित जिल्ह्याचे साहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यास मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग- समाज कल्याण आयुक्तालयाची जाहिरात पाहावी अथवा राज्य शासनाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज आयुक्त - समाजकल्याण- महाराष्ट्र राज्य, 3 चर्च रोड, पुणे-411001 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2012.