आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scholarship Competation Examination: B.Sc Nurshing For Women

शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा: महिलांसाठी सैन्यदलांतर्गत बीएस्सी - नर्सिंग अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैन्यदलांतर्गत विविध आरोग्य व वैद्यकीय आस्थापनांमध्ये उपलब्ध असणा-या बीएस्सी (नर्सिंग), जनरल नर्सिंग वा मिडवाइफरी या चारवर्षीय विशेष पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थिनींनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे विषय घेऊन पहिल्या प्रयत्नात व कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि त्या शारीरिकदृष्ट्या पात्र असायला हव्यात.
* निवड परीक्षा : अर्जदारांपैकी पात्रताधारक महिला उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी जानेवारी 2014मध्ये देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर बोलाविण्यात येईल. परीक्षा केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई परीक्षा केंद्राचा समावेश असेल. निवड परीक्षा बारावीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणा-या उमेदवारांना सैन्यदल निवड मंडळातर्फे मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची वरील अभ्यासक्रमांसाठी निवड करण्यात येईल.
* निवड व नेमणूक : वरील अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणा-या विद्यार्थिनींना सैन्यदलांतर्गत विविध वैद्यकीय आस्थापनांमध्ये नियमांनुसार वेतनश्रेणी व इतर फायद्यांसह नेमण्यात येईल.
* अर्जाचा नमुना, इतर माहिती व तपशील : अर्जाच नमुना, इतर माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 6 ते 13 सप्टेंबर 2013च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमविषयक जाहिरात पाहावी.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स ऑफ एमओडी (आर्मी), एजीज ब्रँच, डीजीएमएस-4 बी, रूम नं. 45, ‘एल ब्लॉक’, नवी दिल्ली-110001 या पत्त्यावर 8 ऑक्टोबर 2013 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.