कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डाटा इंट्री ऑपरेटर्स, कनिष्ठ कारकून यासारख्या पदांवर नेमण्यासाठी निवड करण्याकरिता खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार बारावी ऊत्तीर्ण झालेले असावेत व त्यांच्याजवळ टंकलेखन, संगणक विषयक पात्रता असायला हवी.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिय : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १,१५ व २२ नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, अकोला व जळगाव या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणा-या उमेदवारांना कौशल्य चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या सेवेत दरमहा ५२००-२०२००+२४०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदे पण देय असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १०० रु.ची निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी रिक्रृटमेंट टपाल तिकिटे लावणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमूना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जून २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी विहित नमून्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि रिक्रृटमेंट टपाल तिकिटांसह असणारे अर्ज क्षेत्रीय संचालक विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०००२० या पत्त्यावर पाठवावे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंट, बंगळुरू येथे उपलब्ध असणा-या अँडव्हान्सड मॅनेजमेंट रिसर्च इन प्लँटेशन योजनेअंतर्गत अॅग्री बिझनेस अँड प्लँटेशन मॅनेजमेंटमधील ऑगस्ट २०१५ पासून सुरू होणा-या विशेष अभ्यासक्रमात नोंदणी करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कुठल्याही विषयातील पदवी किंवा सीए, आयसीडब्ल्यूए, कंपनी सेक्रेटरी यासारखी पात्रता कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
विशेष सूचना : सीएटी, जीएमएटी, युजीसी, सीएसआयआर जेआरएफ, एनईटी,आयसीएआर, एनईटी यासारखी प्रवेश परीक्षा देणे ही अतिरिक्त पात्रता समजण्यात येईल.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय ५५ वर्षांहून अधिक नसावे.
निवड पद्धती : अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना फेलोशिप अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. दोन टप्प्यांमधील एकूण ४ वर्षांच्या कालावधीत फेलोशिप पूर्ण करावी लागेल. या अभ्यासक्रमांतर्गत कृषी व्यवस्थापन, उद्योगावर भर असणा-या चहा, कॉफी, रबर, मसाले, नारळ उत्पादन, व्यवस्थापन या विषयांवर शैक्षणिक व व्यवसायिक संदर्भात भर देण्यात येईल.
फेलोशिपची संख्या व तपशील : योजनेअंतर्गत निवड केल्या जाणा-या उमेदवारांची संख्या १० असेल व त्यांना त्यांच्या फेलोशिप कालावधीत संशोधनपर शिष्यवृत्ती व इतर फायदे देय.
भविष्यकालीन संधी : फेलोशिप अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणा-या उमेदवारांना कृषी उत्पादन, चहा, कॉफी, मसाले उद्योग, कृषी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांमधील व्यवस्थापनविषयक कामाशिवाय या क्षेत्रातील शैक्षणिक, संशोधन संस्थांमध्येसुद्धा चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी १००० रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी ५०० रु.चा) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंटच्या नावे असलेला व बंगळुरू येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : फेलोशिप अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ मे २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंट, बंगळुरूची जाहिरात पहावी, इन्स्टिट्यूटच्या दूरध्वनी क्र. ०८०-२३२१२७६७ वर संपर्क साधावा अथवा www.lipmb.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमून्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज अॅडमिशंस ऑफिस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंट, ज्ञान भारती कॉम्प्लेक्स, पोस्ट ऑफिस मलथल्ली, बंगळुरू ५६००५६ (कर्नाटक) या पत्त्यावर पाठवावेत.