आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scholarship Examination: National Defence Academy And Navy Academy Examination 2014

शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा: राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी परीक्षा-2014

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी निवड परीक्षा (1) 2014 अंतर्गत संरक्षण दलात थेट अधिकारी पदावर निवड करण्यासाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय स्तरावरील निवड परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील : योजनेअंतर्गत उपलब्ध जागांची संख्या 375 असून त्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीअंतर्गत 320 (पायदळ 208, नौदल 42, तर वायुदल 70) याप्रमाणे तर नौदल अकादमीअंतर्गत असणा-या 55 जागांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम व खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत.
* राष्ट्रीय संरक्षण अकादमी - पायदळ : अर्जदारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
* राष्ट्रीय संरक्षण अकादमी - नौदल व हवाईदल व नौदल अकादमी : अर्जदारांनी वारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोगट : अर्जदारांचा जन्म 2 जुलै 1995 ते 1 जुलै 1998 च्या दरम्यान झालेला असावा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 20 एप्रिल 2014 रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. त्यानंतर निवडक उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 100 रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा तिच्या कुठल्याही सहयोगी बँकेच्या शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 डिसेंबर 13च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे प्रकाशित करण्यात आलेली राष्ट्रीय संरक्षण अकादमीची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या (www.upsc.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगच्या (www.upsconline.nic.in) या संकेतस्थळावर अर्ज करावा.
बारावी उत्तीर्ण अशा ज्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या माध्यमातून संरक्षण दलांमध्ये अधिकारी पदावर आपले भवितव्य घडवायचे असेल अशांनी या स्पर्धा निवड परीक्षेचा जरूर लाभ घ्यावा.
शिक्षणासाठी जे. एन. टाटा शिष्यवृत्ती
भारतीय पदवीधरांना विदेशातील विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात येणा-या जे. एन. टाटा शैक्षणिक कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा ते पदवी परीक्षेचा अंतिम पात्रता परीक्षेला बसलेले असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. त्यांना विदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासह संशोधनपर कामासाठी जाण्याची रुची असायला हवी. संगणकाचे अद्ययावत ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय 45 वर्षांहून अधिक नसावे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. ही मुलाखत तज्ज्ञ मंडळातर्फे मार्च व जून 2014 मध्ये मुंबई येथे घेण्यात येईल व त्याआधारे त्यांची या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अंतिम निवड करण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 100 रुपयांचा ‘दी जे. एन. टाटा एन्डॉवमेंट’च्या नावे असणारा व मुंबई येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात 24 फेब्रुवारी 2014 पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी जे. एन. टाटा एन्डॉवमेंटच्या (www.dorabjitatatrust.org) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस ऑफ दी जे. एन. टाटा एन्डॉवमेंट, मुल्ला हाऊस, 51, म. गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई-400001 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2014.
ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना कर्जाऊ शिष्यवृत्तीसह विदेशी विद्यापीठ वा शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घ्यायचे असेल अशांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.
कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट - 2014
गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गांधीनगरतर्फे घेण्यात येणा-या कायदा विषयांतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणा-या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत.
अभ्यासक्रमाशी संबंधित संस्था : वर नमूद केलेल्या निवड पात्रता परीक्षेद्वारा बंगळुरू, हैदराबाद, भोपाळ, कोलकाता, जोधपूर, रायपूर, गांधीनगर, लखनऊ, पतियाळा, पाटणा, कोची, कटक, रांची व गुवाहाटी येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येईल.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत.
* कायदा विषयातील पदवी अभ्यासक्रम : अर्जदार विद्यार्थ्यांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा कमीत कमी 45% गुणांसह (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी 40%) उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 1 जुलै 2014 रोजी 20 वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी दोन वर्षांनी शिथिलक्षम आहे.
* कायदा विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम : अर्जदार विद्यार्थ्यांनी कायदा विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 55% गुणांसह (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी 50%) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते कायदा विषयातील पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणारे असावेत.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (सीएलएटी) 2014 साठी बोलावण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील ही प्रवेश पात्रता परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 11 मे 2014 रोजी घेण्यात येईल.
अर्जदार विद्यार्थ्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएलएटी-2014 मधील गुणांकाच्या आधारे त्यांना कायदा विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या विद्यार्थ्यांनी 4000 रु. (राखीव गटातील विद्यार्थ्यांनी 3500 रु.) परीक्षा शुल्क म्हणून संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दूरध्वनी क्र. 079-2327671वर संपर्क साधावा अथवा युनिव्हर्सिटीच्या www.clat.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज वरील संकेतस्थळावर पाठवण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2014.
ज्या विद्यार्थ्यांना कायदा विषयातील पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रम राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधून पूर्ण करायचे असतील अशांसाठी ही संधी उपयुक्त ठरू शकते.
पूर्वतटीय रेल्वेमध्ये महिला खेळाडूंसाठी संधी
पूर्वतटीय रेल्वेमध्ये महिला खेळाडूंसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत-
जागांची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध जागांची संख्या 10 असून त्यामध्ये अ‍ॅथलेटिक्स-2, मुष्टियुद्ध-2, फुटबॉल-3, व्हॉलीबॉल-3 याप्रमाणे उपलब्ध जागांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार महिला कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हव्यात व त्यांनी वरील क्रीडा प्रकारांमध्ये ऑलिम्पिक, राष्ट्रकुल वा आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 25 वर्षांहून अधिक नसावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना क्रीडा कौशल्य चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना पूर्वतटीय रेल्वेमध्ये दरमहा 5200-20200 + 2800 या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना रेल्वेच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेसुद्धा देय असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 60 रुपयांचा एफए अँड सीएओ- ईस्ट कोस्ट रेल्वे यांच्या नावे असलेला व भुवनेश्वर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 28 डिसेंबर 2013 ते 3 जानेवारी 2014 च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्वतटीय रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा रेल्वेच्या www.castcoastrail.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज दी सीनियर डिव्हिजनल पर्सोनेल ऑफिसर, ईस्ट-वेस्ट रेल्वे, खुर्दा रोड डिव्हिजन, पोस्ट-जाटनी, जि. खुर्दा, ओडिशा-752050 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2014.
ज्या महिला खेळाडूंना रेल्वेमध्ये आपली कारकीर्द करायची असेल त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
ग्रीन करिअर्स : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटचा एमफिल अभ्यासक्रम
केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयांतर्गत कार्यरत असणा-या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ येथील एमफिल (नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट) या विशेष अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील : या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणा-या जागांची संख्या 20 असून त्यापैकी 10 जागा सेवारत उमेदवारांसाठी राखीव आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा पदव्युत्तर पात्रता कमीत कमी 55% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी 50%) उत्तर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
विशेष सूचना : जे उमेदवार यंदा वरील पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणार असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्या आधारे त्यांची अंतिम निवड करून त्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 500 रु.चा डायरेक्टर, इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या नावे असणारा व भोपाळ येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या www.iifm.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज चेअरपर्सन- एमफिल (नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट) अ‍ॅडमिशन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, नेहरूनगर, भोपाळ (मप्र) 462003 या पत्त्यावर 2 एप्रिल 2014 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.ज्या पदव्युत्तर पात्रताधारकांना नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन यासारख्या विषयातील एमफिल या विशेष अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा जरूर विचार करावा.