आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशातील शिक्षणासाठी निवडक शिष्यवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय विद्यार्थ्यांना विदेशातील विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्तीसह शिक्षण घेण्यासाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत :
र्‍होड्स स्कॉलरशिप फॉर इंडिया
पार्श्वभूमी : 1903 मध्ये सुरू करण्यात आलेल्या र्‍होड्स स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत आजवर 200 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत दरवर्षी 5 भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येतात.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी मानव्यशास्त्र (ह्युमॅनिटीज), विज्ञान, कायदा, अभियांत्रिकी, कृषी वा वैद्यक-विज्ञान यासारख्या विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वयोगट : उमेदवारांचे वय 1 ऑक्टोबर 2014 रोजी 19 ते 25 वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील : निवड झालेल्या उमेदवारांना ऑक्सफर्ड येथे जाण्या-येण्याचे विमान भाडे, वैद्यकीय विमा व अनुसांगिक खर्चाशिवाय त्यांच्या दोन वर्षांच्या शैक्षणिक कालावधीसाठी वार्षिक 13000 पौंडाची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : शिष्यवृत्तीच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी www.rhodehouse.ox.ac. या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने, वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2013.
१ युनिव्हर्सिटी ऑफ इसेक्स - मास्टर्स स्कॉलरशिप
लंडन परिसरात असणार्‍या इसेक्स युनिव्हर्सिटीतर्फे भारतीय विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी, त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा व त्यांनी ऑक्टोबर 2013 पर्यंत इसॅक विद्यापीठात संबंधित विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असावा.
शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील : योजनेअंतर्गत निवड झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांना 2000 पौंडची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी युनिर्व्हसिटी ऑफ इसेक्सच्या ६६६.ी२२ी७.ंू.४‘ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2013.
ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह इंग्लंडमधील प्रमुख विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करायचे असतील अशांचा या शिष्यवृत्ती उपयुक्त ठरू शकतात.