आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरीशी संबंधित टेक्निकल डिप्लोमा करणाऱ्या ५५० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल.
के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थांतून डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. महिंद्रा राष्ट्रीय स्तरावर टॅलंट स्कॉलरशिपच्या माध्यमातून निवडलेल्या ५५० विद्यार्थ्यांना तीन शैक्षणिक वर्षांपर्यंत दरवर्षी १०,००० रुपये शिष्यवृत्ती देईल.

पात्रता : दहावी, बारावी उत्तीर्ण होऊन २०१५ या वर्षांत सरकार मान्य पॉलिटेक्निक संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. दहावीत प्रथम श्रेणी किंवा किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे.

अर्जाचे स्वरुप : इच्छुक विद्यार्थी अर्जाचा नमुना वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकतात. पूर्ण भरलेला अर्ज स्वत:च्या पत्त्याचे पाकीट व अत्यावश्यक कागदपत्रे जोडून या पत्त्यावर पाठवावा. - एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट, सेसिल कोर्ट, ितसरा मजला, रिगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग, मुंबई ४००००१.
निवड : निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीची तारीख व ठिकाणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. प्रवास खर्च विशिष्ट मर्यादेपर्यंत दिला जाईल.
वेबसाइट : http://www.kcmet.org/what-we-do-Scholarship-Grants.aspx
बातम्या आणखी आहेत...