आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विषयक शिष्यवृत्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडमधील लोहब्रुग विद्यापीठ ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा-शारीरिक क्षमता व आरोग्यविषयक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय स्वरूपात काम करीत असून, विद्यापीठातर्फे या निवडक क्षेत्रात शैक्षणिक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत-

योजनेअंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्ती व समाविष्ट विषय : या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या १०० असून, या शिष्यवृत्ती २०१४ या शैक्षणिक सत्रात विद्यापीठामध्ये उपलब्ध असणाऱ्या क्रीडा, मानवीय शारीरिक क्षमता, क्रीडा, व्यवस्थापन, क्रीडाविषयक मानसशास्त्र यासारख्या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांसाठी देण्यात येत असून, या अभ्यासक्रमांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

लोहब्रुग विद्यापीठाची पदव्युत्तर अभ्यासक्रम शिष्यवृत्ती : ही शिष्यवृत्ती विद्यापीठामध्ये उपलब्ध असणाऱ्या क्रीडा, शारीरिक क्षमता, आरोग्य विज्ञान यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध आहे.

निवड पद्धती व शिष्यवृत्तीचा तपशील : या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांची त्यांची क्रीडा-क्रीडा व्यवस्थापन व वर नमूद केल्याप्रमाणे क्रीडा क्षेत्राशी संबंधित विषयातील पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व क्रीडाविषयक योगदान या आधारे करण्यात येते.
योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या शुल्कापैकी २५% शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीपोटी देण्यात येते.
लोहब्रुग विद्यापीठाची पदव्युत्तर पात्रतेनंतरची क्रीडाविषयक शिष्यवृत्ती : ही योजना लोहब्रुग विद्यापीठातर्फे क्रीडा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पात्रता पूर्ण करून त्यानंतर शैक्षणिक वा संशोधनपर अभ्यास वा काम करणाऱ्यांना लागू आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्यांना त्यांच्या पदव्युत्तर पात्रतेनंतरच्या शैक्षणिक वा संशोधनपर कामासाठी त्यांच्या शैक्षणिक वा संशोधन शुल्कापैकी १०% रक्कम विशेष शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येते.

क्रीडा वा संबंधित क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदव्युत्तर पदवी व त्यानंतरचे शैक्षणिक, संशोधनपर काम करू इच्छुकांनी यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंग्लंडमधील लोहब्रुग विद्यापीठाच्या www.ucas.com अथवा www.lbaro.ac.uk या संकेतस्थळांना अवश्य भेट द्यावी.