आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विज्ञान शिक्षण: उजवा की डावा मेंदू?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आपण कोणताही प्रयोग करण्याऐवजी फक्त निरीक्षणे करायची आहेत. आपल्या मेंदूचे डावा आणि उजवा असे दोन भाग आहेत. डावा भाग उजव्या बाजूच्या शरीराचे तर उजवा भाग डाव्या बाजूच्या शरीराचे नियंत्रण करतो. दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कान असले तरी आपण यातील डावा किंवा उजवा भाग अधिक प्रभावीपणे वापरत असतो. हे असे का करतो हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आपल्या शरीरातील डावा भाग प्रभावी आहे की उजवा हे आपण शोधून काढायचे आहे.


प्रयोगासाठी साहित्य : आपण स्वत:, वाड्यातील मुले, ज्येष्ठ व्यक्ती, घरातील सर्वजण, शाळेतील मित्र, घरी आलेले पाहुणे सर्वांना या निरीक्षणामध्ये सहभागी करून घ्या. केलेल्या निरीक्षणामधून गोळा केलेली माहिती निश्चितपणे मनोरंजक असेल. बरे तुमच्या शरीराचा कोणता भाग प्रभावी आहे याचा तुमच्या व्यक्तिमत्वाशी काहीं संबंध आहे की नाही याचे उत्तर मिळवून पहा.


एका कागदावर ज्यांचे निरीक्षण करायचे त्यांची नावे एका खाली एक लिहा. नावांच्या यादीसमोर एक-दोन-तीन, असे पाच सहा कॉलम करा. आज आपण डोळा, कान, हात, पाय या अवयवांचे निरीक्षण करणार आहोत. देवघरातील मोठा शंख, टिकटिक करणारे घड्याळ, कागदाची 20-25 सेमी लांबीची सुरळी, एक दोन रुपयांचे नाणे, बॉल पेन एवढ्या वस्तू पुरेशा आहेत. आवश्यक सर्व वस्तू हाताशी ठेवा. पहिल्या व्यक्तीस त्याचे नाव लिहायला सांगा. तो उजव्या किंवा डाव्या हाताने नाव लिहील पुढील हात या कॉलममध्ये उजवा यावर बरोबरची खूण करा. जमिनीवर नाणे टाका त्याच व्यक्तीस नाण्यावर पाय ठेवायला सांगा तो उजवा किंवा डावा पाय नाण्यावर ठेवेल. कागदाची सुरळी त्याच्या हातात द्या. डोळ्याने तीस एक फुटावरील वस्तू सुरळीमधून पहायला त्याला सांगा तो वस्तू कागदाची सुरळी मधून डाव्या किंवा उजव्या डोळ्याने पहाण्याचा प्रयत्न करेल. शंख त्याला हातात द्या. शंखामधील आवाज त्याला ऐकण्यास सांगा. तो सहजपणे तो डाव्या किंवा उजव्या कानाजवळ नेऊन ऐकण्याचा प्रयत्न करेल. सर्वच व्यक्तींच्या वरील चाचण्यांचा निष्कर्ष बरोबर किंवा चूक अशा खुणानी नोंदवा.


तुमच्या लक्षात येईल की दोन डोळे, दोन कान, दोन हात आणि दोन पाय जरी असले तरी त्यातील एक अधिक प्रभावाने वापरण्याची आपल्याला सवय झालेली असते. एवढेच नव्हे तर खुर्चीमध्ये बसल्यानंतर आपण डाव्या पायावर उजवा पाय ठेवतो की उजव्या पायावर डावा पाय? किंवा हाताचे पंजे एकत्र आणल्यानंतर उजवा अंगठा वर असतो की डावा, झोपताना डाव्या कुशीवर अधिक झोपतो की उजव्या अशा नेहमी लक्ष न देणा-या बाबीमध्येसुद्धा डावी किंवा उजवी बाजू अधिक प्रभावी असते. याउलट करून पहा तुम्हाला बेचैन वाटायला लागेल.


अर्थात डाव्या की उजव्या बाजू प्रभावी असल्याने नेहमीच्या कामात काही अडथळे येतात. बहुसंख्य व्यक्ती उजव्या बाजूने काम करीत असल्याने उजव्या बाजूला गाडीचा अ‍ॅक्सिलरेटर, डाव्या बाजूला क्लच, मोटरसायकलवर चढताना डाव्या बाजूने की उजव्या बाजूने पाय टाकायचा, कॅमे-याचे शटर उजव्या बाजूस, रायफल शूटिंग करताना उजवा डोळा अशी योजना असल्याने डावी वाजू प्रभावी असलेल्या व्यक्तीना प्रारंभी उजव्या बाजूसाठी बनवलेल्या वस्तू वापरताना थोडे दिवस अडचणीचे वाटते. याला अपवाद फक्त डावखु-या खेळाडूंचा. क्रिकेटपटू डाव्या हाताने चेंडू टाकत असेल तर उजव्या हाताने बॅटिंग करणा-या खेळाडूस अडचणीचे वाटू शकते.


madwanna@hotmail.com