आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: घरी साबण बनवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण आपल्याला हवा तसा घरीच साबण बनवला तर? कल्पनाच किती छान आहे? सध्या बाजारात डिटर्जंट वड्यांऐवजी मागील पिढीमध्ये फक्त साबण मिळायचा. आज साबण फक्त स्नानाचा आणि कपडे धुण्यासाठी डिटर्जंट वडी किंवा पावडर अशा स्वरूपामध्ये मिळतो. घरी कपडे धुण्याचा साबण बनवणे हा आजचा प्रयोग. साबण बनविण्यासाठीचा कच्चा माल पुरवणा-या स्टोअर्समधून आणता येतो. सोडियम हायड्रॉक्साइड 200 ग्रॅम, पाम तेल 200 ग्रॅम, पाणी, मीठ, तेल गरम करण्यासाठी गॅस किंवा विजेची शेगडी, लाकडी चमचे, तयार साबणाला आकार देण्यासाठी चौकोनी साबणाच्या आकाराचे पुठ्ठ्याचे बॉक्स, बटर पेपर आणि तयार साबण कापण्यासाठी सुरी. साबण बनवण्याची बहुतेक सर्व कृतीमध्ये कमीत कमी उष्णता लागते. त्यामुळे या साबण बनवण्याच्या पद्धतीस कोल्ड प्रोसेस म्हणतात.


या पद्धतीतील काळजी घेण्याचा भाग म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड व पाण्याचे मिश्रण बनवणे. हे साबण बनवण्याआधी तयार ठेवावे लागते. सोडियम हायड्रॉक्साइड उघड्या त्वचेवर पडल्यास तीव्र दाहक आहे. बाजारात सोडियम हायड्रॉक्साइड कपच्यांच्या किंवा गोळ्यांच्या स्वरूपात मिळते. अंगाचा साबण बनवायचा असल्यास सोडियम हायड्रॉक्साइड ऐवजी पोटॅशियम हायड्रॉक्साइड वापरतात.


200 मि.लि. पाण्यात 200 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइडचे तुकडे हळूहळू घाला. अधून-मधून लाकडी चमच्याने मिश्रण हलवा. सोडियम हायड्रॉक्साइड पाण्यात विरघळताना प्रचंड उष्णता निर्माण होते. सर्व सोडियम हायड्रॉक्साइड विरघळवताना त्वचेवर पडणार नाही याची काळजी घ्या. आवश्यकता वाटल्यास रबरी मोजे घाला. मिश्रणाचा रंग दुधी होईल. तयार मिश्रण बाजूला ठेवा. तयार मिश्रण सांडणार नाही याची पूर्ण काळजी घ्या. एक लिटर आकाराच्या स्टीलच्या भांड्यामध्ये पाव लिटर (250मिलि) पाम तेल घ्या. पाम तेलाऐवजी कोणतेही खाद्य तेलापासून साबण बनवता येतो. अगदी करंजीचे किंवा एरंडीच्या तेलापासून सुद्धा साबण बनवता येतो. पण त्यासाठी लागणारे सोडियम हायड्रॉक्साइडाचे प्रमाण निश्चित करावे लागते. तेलाचे भांडे तेलासहित गॅस वर तापवा. तेल सुमारे 100 सेल्सियस अंश एवढ्या तापमानावर गरम केल्यास भांडे गॅसवरून टेबलासारख्या सपाट पृष्ठभागावर ठेवा.


आता सोडियम हायड्रॉक्साइड व पाण्याचे मिश्रण तेलाच्या भांड्यामध्ये थोडे थोडे ओता. हे मिश्रण सतत लाकडी चमच्याने किंवा दांड्याने हलवत रहा. तुमच्या डोळ्यादेखत तेल आणि सोडियम हायड्रॉक्साइड मिश्रणाचे साबणामध्ये रूपांतर होताना तुम्हाला दिसेल. साबण अधिक आकर्षक व्हावा असे वाटत असल्यास त्यात थोडे लिंबूसत्त्व मिसळल्यास साबणास छान लिंबाचा वास येईल. सर्व मिश्रण ओतून झाले तरी ते लाकडी चमच्याने हलवणे आवश्यक आहे. मिश्रणात चमचाभर मीठ टाकल्यास साबण एकत्र होतो. पाणी व ग्लिसरीन वेगळे होते. घट्ट झालेले साबणाचे मिश्रण आता बारसारख्या साच्यात ओता. घरी असलेले बांगड्यांचे पुठ्ठ्याचे डब्यामध्ये बटर पेपर लावून त्यात मिश्रण ओतल्यास साबण पुठ्ठ्यास चिकटत नाही. ओतलेला साबण 24 तासानंतर कापण्यायोग्य होतो. त्याच्या योग्य आकाराच्या वड्या कापा व वॉश बेसिनवर अभिमानाने ठेवा. पातेल्यामध्ये शिल्लक राहिलेले पाणी व ग्लिसरीन ओतून टाका.