आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण : अननसातील विकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवणानंतर जिलेटिन किंवा जेली खायला मुलाना फार आवडते. जिलेटिन सेट होताना त्यात फळांचे तुकडे घातले तर अधिकच बहार. एक तुकडा थंडगार जिलेटिन व त्यानंतर थंडगार फळांचे तुकडे. जिलेटिन पावडरच्या स्वरूपात लहान पाकिटामध्ये मिळते. आज आपण या जिलेटिनमध्ये काहीं फळांचे तुकडे घालून काय होते ते पाहायचे आहे.
आइस्क्रीमसाठी लागणा-या सर्व वस्तू एकत्र मिळणा-या दुकानातून जिलेटिन पावडरचे एक पाकीट आणा. एक अननस, सफरचंद, चिकू, केळी अशी चार फळे आणा. जिलेटिन पावडर गरम पाण्यात विरघळवून ते पाच एकाच आकाराच्या काचेच्या बाउल्स मध्ये सेट करायला फ्रीझमध्ये ठेवून द्या. तुम्हाला जिलेटिन जेवणानंतर स्वीट डिश म्हणून खायचे असल्यास दोन तास आधीच ते सेट करायला हवे. जिलेटिन सेट करण्याआधी त्यात एकाच आकाराचे आपण आणलेल्या फळांचे लहान तुकडे टाका.


आता दोन तासाने सेट करायला ठेवलेल्या जिलेटिन बाउल्स चे निरीक्षण करा काय दिसले ते नोंदवून ठेवा. सफरचंद, चिकू, केळ्यांचे तुकडे घातलेले जिलेटिन व्यवस्थित सेट झाले आहे. हे थंडगार जिलेटिन खायला मजा येते, पण अननसाचे तुकडे घातलेल्या जिलेटिनच्या बाउलमधील जिलेटिन घट्ट होण्याऐवजी पातळ झाले ते गोठून घट्ट झालेच नाही. हे असे का झाले याचे उत्तर फळाच्या रसात आहे. अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचे प्रथिन विरघळवणारे विकर आहे. प्रत्यक्षात जिलेटिन हे जनावरांच्या शरीरातील कोलॅजेन उच्च तापमानास विघळवून बनवलेले आहे. अननसातील ब्रोमेलिन प्रथिनांचे विघटन करते. त्यामुळे प्रथिन वितळते व जिलेटिन घट्ट होतच नाही.

अननसाऐवजी कच्च्या पपईचे तुकडे सेट होताना बाउलमध्ये घालून पहा. पपईमध्ये पेपेन नावाचे प्रथिनाचे विघटन करणारे विकर आहे. हे सुद्धा जिलेटिन घट्ट होऊ देत नाही. ज्या व्यक्ती पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यानी जिलेटिन विकत घेताना ते प्राणिज आहे की वनस्पतीज आहे याची खात्री करून घ्यावी. वनस्पतीज जिलेटिनवरसुद्धा अननसातील ब्रोमेलिन किंवा पपईतील पेपेन कार्य करते.