आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. किती पाऊस कोठे पडला हे वर्तमानपत्रात नेहमी येत असते. पण तुम्ही जेथे राहता, शाळेमध्ये किती पाऊस पडला, चौकात किती आणि शेतात किती हे कधीच कळत नाही. तुमच्या गावात त्यातल्या त्यात तुमच्या अंगणात किती पाऊस पडला हे कळायची सोय झाली तर किती मजा येईल? यासाठी आजचा प्रयोग. हे तात्पुरते पर्जन्यमापक तुम्हाला प्रत्येक पावसाळ्यात वापरता येईल.यासाठी लागणारे साहित्य अगदी किरकोळ आहे.
एक दंडगोलाकृती प्लॅस्टिकची किंवा काचेची बाटली. बाटलीचे बूड जेवढ्या व्यासाचे असेल त्याच व्यासाचे एक नरसाळे. बाटलीवर खुणा करण्यासाठी पाण्याने पुसली जाणार नाही अशा शाईचा मार्कर. याला वॉटरप्रूफ मार्कर म्हणतात. आयत्या खुणा असलेले मोजपात्र प्रयोगशाळेत असते. फक्त मोजपात्राचे तोंड आणि तुम्ही घेतलेल्या नसराळ्याचा व्यास समान हवा.
खाली दिलेली आकृती नीट पाहा. आकृतीतील मोजपात्रावर आयत्या खुणा आहेत. खुणा नसल्या तरी पाऊस किती पडला हे सोप्या गणिताने काढता येते.
नरसाळ्याचा व्यास मोजा. त्याला दोनने भागले म्हणजे त्याची त्रिज्या समजते. त्रिज्येच्या आकड्याचा 3.14 बरोबर गुणाकार केला म्हणजे नरसाळ्याचे क्षेत्रफळ समजते. नरसाळ्याची त्रिज्या 10 सेंमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ 7.855 चौ. सेंमी येते. ज्या ठिकाणी पाऊस मोजायचा आहे तेथे उघड्यावर तुमचे पात्र ठेवून द्या. अर्थात नरसाळ्याच्या पृष्ठभागाएवढा पाऊस मोजपात्रात जमा होईल. मोजपात्रात जमा झालेले पाणी मोजा. मोठ्या इंजेक्शनच्या सिरिंजवर आकडे असतात. त्याने जमा झालेले पाणी मोजा. समजा चोवीस तासात 50 मि.लि. पाणी मोजपात्रात जमा झाले. जमा झालेल्या पाण्यास नरसाळ्याच्या क्षेत्रफळाने भागले म्हणजे किती मिमी पाऊस झाला हे समजेल. उदा. 50 मि.लि.भागिले 7.855 नरसाळ्याचे क्षेत्रफळ = 6.365 मिमी पडलेला पाऊस.
आता काही सूचना : ऊर्ध्वपतनाने पर्जन्यमापकामध्ये जमा झालेल्या पाण्याच्या पातळीत घट होऊ नये असे वाटत असेल तर पाऊस जमा करण्याआधी मापकात 2-3 मि.लि. स्वयंपाकासाठी वापरायचे गोडेतेल घाला. पाण्याहून तेल हलके असल्याने ते वर तरंगेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.