आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचेसंबंधी महत्त्वाची गुपिते...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला माझे केस आवडतात, पण माझी त्वचा तिच्या त्वचेसारखी चमकदार असती तर! किंवा जीव ओवाळून टाकावा अशी ती लांब, दाट वेणी माझीही असती तर! माझी कांती जरा आणखी थोडी उजळ असती तर! स्वत:ला सुंदर बनवण्याच्या आपल्या इच्छा अनंत असतात आणि त्यामुळे आपण बाजारात जातो ते उत्पादनांची, रसायनांची आणि उपचारांची भलीमोठी यादी घेऊन. त्यामुळे आपले प्रमाणाबाहेर पैसे खर्च होतात, पण आपली चिवट आशा आपल्याला शोध पुढेही सुरूच ठेवायला भाग पाडते. अतिसुंदर दिसणे सोपे नाहीच, पण काही मूलभूत गोष्टी बरोबर आहेत का हे तुम्ही कधी तपासून बघितले आहे का?


थांबा आणि त्यावर विचार करा. आपल्या आयुष्यातील मागील वीस किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्षांपासून जे आपल्याबाबतीत आहे ते फक्त वीस मिनिटांसारख्या तात्पुरत्या उपायांनी दूर होईल का? अर्थातच अशी कोणतीही जादूची छडी नाही. अशी उत्पादने फार तर थोड्या काळासाठी काही प्रमाणात तुमच्या त्वचेला उजळ बनवतील, पण खरी मजा आहे कायमस्वरूपी तुमच्याबरोबर राहील असे काही करण्यात. सुंदर शरीर असो की निर्दोष, कांती किंवा चमकदार केस सगळ्याची मुळे आपल्या आत खोलवर दडलेली असतात. आपल्या शरीर व आत्म्यासाठी जे आपण चांगले आरोग्य राखतो त्याचेच प्रतिबिंब आपल्याबाहेर उमटते. आपले शरीर म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली आणि सुखी-आनंदी मन यांचे प्रतिबिंब असते. तथाकथित नैसर्गिक पद्धतींवर काही जण विश्वास ठेवतात, पण जर ते पूर्णपणे नैसर्गिक व दीर्घ काळ टिकणारे हवे असेल तर तुमचे खाणे हा त्यासाठी खरोखर एक क्वालिटी कंट्रोल आहे! तुमच्या शरीराच्या आतमध्ये काय चाललेले आहे हे तुम्हाला दिसत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की, ते कधीच दिसणार नाही. जे समोर येईल ते विचार न करता जर तुमच्या शरीरात तुम्ही ढकलणार असाल तर नक्कीच त्याचे प्रतिबिंब तुमच्या त्वचेवर पडेल. त्वचा निर्जीव दिसणे, मुरमे असा त्रास होईल, केस तेलकट दिसतील, तुटतील किंवा त्यात कोंडा होईल इत्यादी. सीटीएम म्हणजे क्लीन्स टोन मॉइश्चरायझर. म्हणजेच शुद्ध करणे - जोमदार करणे - आर्द्रता हा त्वचेची काळजी घेण्यासाठीचा नित्याचा परिपाठ असतो. सौंदर्यासाठी नियमित उपचारांचा भाग म्हणून आपल्यापैकी अनेकांना त्याची माहिती आहे. याचाच उपयोग अंतर्गत उपचारांसाठी केला तर? तर सुंदर उल्हसित स्वत:ची तुम्हाला नव्याने ओळख होईल.


क्लीन्स - शुध्द करणे झ्र श्वासावाटे आणि खाण्यातून रोज जे टॉक्सिन (जैवविष) तुमच्या शरीरात जाते त्यापासून स्वत:ला मुक्त करा. त्यासाठी भरपूर फळे, भाज्या आणि तंतुमय पदार्थ खा. आपले शरीर शुद्ध राहावे आणि आपल्या आतड्यात अनावश्यक मळ साठू नये यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे तंतुमय पदार्थ खाणे. त्वचेसाठी महत्त्वाचे गुपित - तत्काळ शोषण आणि तत्काळ शुद्धीकरणासाठी सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे भाज्यांचा ताजा रस. रोज एक ग्लास प्या आणि त्वचा कशी चमकते ते बघा. टोन - जोमदार करणे - रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यायाम करा. मग ते योगा असो की जिम की तुमचा आवडता खेळ किंवा जलद चालणे (ब्रिस्क वॉक). तुमचे शरीर नैसर्गिकरीत्या सुदृढ ठेवा आणि त्याचा तजेलदारपणा कायम राखा. त्वचेसाठी महत्त्वाचे गुपित - घाम गाळणे हा तुमच्या शरीरावरील रंध्रे मोकळी करण्याचा सर्वात उत्तम मार्ग. व्यायाम केल्यानंतर गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने शॉवर घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या शरीराची रंध्रे बंद होतात आणि त्वचेला तजेला मिळतो. मॉइश्चरायझर आर्द्रता - भरपूर पाणी प्या. बहुतेक समस्याप्रवण त्वचेकरिता सजलित शरीर अतिशय परिणामकारक आहे. त्वचेसाठी महत्त्वाचे गुपित - पाणी पिताना त्यात भरपूर लिंबू टाका. त्यामुळे तुमच्या शरीरात जास्तीचे पाणी साठून राहत नाही तसेच त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळते. या व्हिटॅमिन सीमुळे तुमची कांती उजळ होते.


(लेखिका बॉलीवूडच्या सौंदर्यतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात)