आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक स्वावलंबनाचे अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण जेव्हा एखाद्या करिअरची निवड करतो, तेव्हा ते करिअर आपल्याला आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर आहे याचा विचार आपण करत असतोच, पण आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचे देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात किती योगदान असेल याचा विचारही करणे आवश्यक आहे. आपण आतापर्यंतच्या लेखात नमूद केलेल्या कोर्सेसमध्ये ठरवलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या नियमानुसार प्रवेश दिला जातो हे वाचले, ज्यांत कमीत कमी शैक्षणिक पात्रता आठवीपर्यंतची होती. पण असे किती लोक आहेत, ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, जे साक्षर आहेत, पण त्यांच्याकडे शालेय शिक्षण जास्त प्रमाणात नाही? अशा विद्यार्थ्यांना महाराष्‍ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग द्वारा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी व खादी आणि ग्रामोद्योग या संस्थेच्या माध्यमाने मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये अनेक कोर्सेस चालविले जातात.


खादी आणि ग्रामोद्योग म्हणजेच केवीआयसी या सरकारी संस्थेत सूक्ष्म, लघु, मध्यम व्यापाराच्या मंत्रालयाद्वारा आठवडाभराच्या कालावधीपासून नऊ महिन्यांपर्यंतच्या कालावधीचे कोर्सेस चालविण्यात येतात. सरकारी संस्था असल्यामुळे आणि खादीच्या या कोर्सेसचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा आणि स्वयंरोजगाराला संधी देण्याकरिता या कोर्सेसची फी अत्यल्प आहे. येथे मात्र एकमात्र असा कोर्स आहे, ज्यामध्ये प्रवेश पात्रता बीएस्सी (केमिकल्स) आहे आणि तो म्हणजे अ‍ॅडव्हान्स्ड् कोर्स इन फुटवेअर अँड लेदर गुड्स. या कोर्समध्ये विज्ञानाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.खादीचे नाव ऐकल्यावर असे वाटते की कुटीर उद्योग म्हणजे फक्त कपडे आणि गृहोपयोगी वस्तूंचा समावेश होतो, पण येथे कुटीर उद्योग कोर्सेसची माहिती वाचून आपल्याला खादीच्या व्यापक परिभाषेची कल्पना नक्कीच येईल. येथे आठवडाभराचे व ज्या कोर्समध्ये साक्षर असलेले म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येते, अशा उमेदवारांकरिता कोर्सेस आहेत. या कोर्सेसपैकी काही खालीलप्रमाणे आहेत :
बी कीपिंग शॉर्ट टर्म कोर्स, चीप्स मॅन्युफॅक्चरिंग, शॉर्ट टर्म कोर्स इन हँडमेड पेपर, क्लिनिंग पावडर मेकिंग कोर्स हे दोन आठवडे ते एक महिना अशा कालावधीचे आहेत.


लीफ कप अँड प्लेट मेकिंग (द्रोण आणि पत्रावळी बनविण्याचे कोर्स), मसाला कोर्स, पापड मेकिंग, स्क्रीन प्रिंटिंग, बुक बायंडिंग, व्हाइट फिनाईल मॅन्युफॅक्चरिंग या कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास अशी आहे. काही कोर्सेस शालेय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांकरिता आहेत. आंत्रप्रेन्युअर कोर्स ऑन हँडमेड पेपर मॅन्युफॅक्चरिंग हा दोन महिन्यांचा कोर्स स्वत:चा व्यवसाय सुरू करायला फायदेशीर ठरू शकतो. खादी टेक्नॉलॉजी वुल, खादी टेक्नॉलॉजी पॉली वस्त्र, खादी टेक्नॉलॉजी कॉटन हे तीन कोर्सेस शालेय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता आहेत. याशिवाय अशा उमेदवारांकरिता प्लास्टिक प्रोसेसेस, प्लास्टिक टेक्नॉलॉजी, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर ट्रेड आयटीआय हे कोर्सेससुद्धा आहेत.
तसेच या संस्थेतून कोर्स केल्यानंतर उद्योग सुरू करण्याकरिता सरकारतर्फे कर्जही मिळू शकते. मुंबईत या कोर्सेससाठी निवासस्थानाची सोय आहे. महाराष्‍ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग ही संस्था बी कीपिंग म्हणजेच मधमाशी पालनाचा उद्योग करण्याकरिता आणि स्वयंरोजगाराला वाव देण्याकरिता खर्चाच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून, तर 25 टक्के रक्कमेची सबसिडी मिळू शकते. या उद्योगातून मध, मेण व यातून बनणारे इतर उत्पादने तयार करता येतात. हा कोर्स नि:शुल्क असून ज्या विद्यार्थ्यांना रोजगाराची गरज आहे किंवा ज्यांना स्वयंरोजगाराची इच्छा आहे त्यांच्याकरिता ही सुवर्णसंधी आहे.
खादी आणि ग्रामोद्योगच्या माध्यमातून पुण्यात हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट संस्था सुरू आहे. येथे राष्‍ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यात येते. शिवाय कोल्हापूर, नंदुरबार, परभणी, नागपूर, पुणे, अकोला, जळगाव, बीड या ठिकाणी या संस्थेच्या कार्यशाळा आहेत.
भारतीय पारंपरिक कला व उत्पादनांना सध्या परदेशात मोठी बाजारपेठ निर्माण झालीय. खादी आणि ग्रामोद्योगसारख्या संस्थेतून प्रशिक्षण आणि गुणवत्ता यांचे शिक्षण दिले जाते. या शिक्षणाचा उपयोग जर उद्योग सुरू करण्याकरिता केला, तर याचा लाभ फक्त उद्योजकालाच नव्हे, तर देशालाही नक्कीच होऊ शकेल.