आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यायाला वाचा फोडूया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीचे वारे असते तेव्हा प्रचार करायला स्त्रियांचा हिरीरीने सहभाग असतो. जेव्हा एखादी स्त्री निवडणूक लढवते तेव्हा ती अतिशय शिस्तप्रियतेने प्रशासन सांभाळते. काही महत्त्वाचे निर्णय घेते तसेच निर्णय घेताना सर्वांना विचारात घेऊन सहमतीचा विचार केला जातो. जेव्हा आपण समाजाचा विचार करतो तेव्हा त्या समाजासाठीही आपले काही ऋण असतेच की ते ऋण फेडण्याचा ती प्रयत्न करते. महिला मंडळाची स्थापना करून नवनवीन कार्यक्रमांची आखणी होते व त्यातून समाजासाठी म्हणून काही तरी करण्याची संधी प्राप्त होते.

आजकाल सगळीकडे महिला बचत गटांची स्थापना होतेय. केवळ शहरातच नाही, तर खेड्यातही स्त्रियांना स्वत:चा असा व्यवसाय करता येऊ लागला आहे. त्यामुळे खेड्यातील स्त्री स्वावलंबी होऊ लागलीय. परवा एका खेडेगावात जाण्याचा प्रसंग आला. तेथील महिला स्वत: बचत गटाचे हिशेब पाहताना आढळल्या. तसेच येणारी रक्कम, व्याज हे सर्व त्यांनी स्वत: पाहून, शिवाय बँकेत रक्कम जमा करण्यासाठी त्या स्वत: गेल्या हे पाहून खरंच मन आनंदून गेलं. याच का त्या स्त्रिया ज्या फक्त ‘घरदार’ पाहत होत्या. आज बँकेचे व्यवहार करताहेत. म्हणजेच गटांनी खरंच स्त्रियांना साक्षर केलं.

नवीन वर्षात आपण लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत. या वर्षात स्त्रियांना किती जागा मिळतात पाहूया. राजकारणात सध्या बदलाचे वारे जोरात वाहत आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. भ्रष्टाचार, महागाई, वीज या सर्व प्रश्नांना जनता खरंच कंटाळून गेलीय. तेव्हा आता आपण स्त्री म्हणून या सर्व गोष्टींना वाचा फोडूया.