Home | Magazine | Kimaya | Shankar Vaidya Poem In Marathi, Marathi Literature

शांतता

शंकर वैद्य | Update - Sep 24, 2014, 06:04 AM IST

घराचे पाठीमागले दार उघडले... तेवढाच काय तो कडीचा आवाज बाकी शांतता... हरिवी शांतता... गार शांतता... हरिव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकरिण फुले फुललेली

 • Shankar Vaidya Poem In Marathi, Marathi Literature
  घराचे पाठीमागले दार उघडले...
  तेवढाच काय तो कडीचा आवाज
  बाकी शांतता... हरिवी शांतता... गार शांतता...
  हरिव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकरिण
  फुले फुललेली...उमलती शांतता...मंद गंध
  नव्हे ... प...रि...म...ल
  अलगद उडणारी फुलपाखरे
  फांदीवर सरडा..सजग...स्तब्ध
  पलीकडे उंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
  त्याभोवती घारीचे भ्रमण
  शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
  सरसरत गेलेला पानांचा आवाज...साप
  ...नंतर कोसळती शांतता
  पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
  ...शांतता सजीव...गतिमान
  अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
  एक अलवार बाळपीस
  वा-याची मंद, नीरव झुळूक
  दयाळ पक्षाची एक प्रश्नार्थक शीळ
  ...शांतता मधुरलेली
  मऊ मातीवर उमटलेली माझी पावले...
  त्यांचे ठसे जादूचे...गूढ
  पुढे पुढे नेणा-या पाऊलवाटेचे लाडीक वळण
  पुढे गहन..गगन
  शांततेत उभे माझे निवांत एकटेपण!
  केस लागले पिकाया
  आता डोईवरी केस लागले पिकाया
  एक बरे आता तिला कमी लागले दिसाया
  आता बोलताना येतो कंप आवाजाला
  एक बरे तिला कमी येते ऐकायला
  थरथरे माझा हात काम करताना
  तिला वाटे धांदलीचा स्वभावच जुना
  अजूनही मला दिसते ती सुंदर
  काय फसवितो चष्म्याचा नंबर!
  एक दार बंद
  एक एक दार बंद
  एक एक चेहरा
  होय पाठमोरा
  अस्तावर भिजलेला
  चंद्र उभा मावळता
  झाडीतून झरणारा
  तम उरला मजपुरता
  गळलेल्या पर्णातून दूर निघे वारा
  एक एक दार बंद
  जुळवियली मी नाती
  जीव ओतुनी जगती
  ओघळून दव सारे
  वेल सुकी ये हाती
  काय सुकत जायाचा बहर असा सारा
  एक एक दार बंद
  पटल्या ना काहि खुणा
  शब्द कुठे जाइ उणा
  नजरा जुळल्या न कुठे
  स्वार्थ कुठे होइ उणा
  तुटल्या वाटांवर मन घालि येरझारा!
  एक एक दार बंद..

Trending