आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी दोन हजार वर्षे जुनी, अनेक शिलालेखही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे. तिला समृद्ध अशी साहित्य परंपरा आहे. पण दुर्दैवाने आपल्या मायमराठीला अजूनही अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला गेला नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. अभिजात भाषेच्या दर्जासाठी लागणार्‍या सर्व निकषात मराठी बसते. आपली भाषा ही दोन हजार वर्षे जुनी आहे. मराठीतून कोरले गेलेले अनेक शिलालेख सापडलेले आहेत. एक हजार वर्षापासून मराठीतून सकस अशी साहित्यनिर्मिती होत आहे. मायमराठीला स्वतंत्र अशी परंपराही आहे. मराठी भाषेचे आधुनिक रूप तिच्या प्राचीन रूपाहून वेगळे असले तरी त्यांच्यात आंतरिक नाते आहे. थोडक्यात अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केलेले आहेत. आज कोट्यवधी लोक ही भाषा बोलतात. दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीसुद्धा बोलत होते.