आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांपासूनचा थायरॉइड तीन महिन्यांत बरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला सहा वर्षांपूर्वी कंबर व पोट दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्या नंतर पाच वर्षांपूर्वी पित्ताचा त्रास सुरू झाला. तीन वर्षांपूर्वी पायांवर सूज येण्यास सुरुवात झाली. दोन वर्षांपूर्वी वरील त्रासासोबत वजन वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे डाॅक्टरांना दाखवले त्यावेळी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार केलेल्या तपासणीत थायराॅइड नावाचा आजार आहे हे कळले. औषधोपचार सुरू झाले. त्यानंतर वर्षापूर्वीपासून हाताचे सांधे दुखण्यास व पायांना गोळे येण्यास सुरुवात झाली. चार महिन्यांपासून ताण-तणावामुळे डोके दुखण्यास सुरू झाले आणि दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासून मान, खांदा दुखणे व हातांना मुंग्या येणे व बधिरपणा जाणवणे सुरू झाले.

प्रत्येक त्रासासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घेतले, तरीही त्रास कमी होत नव्हता. माझा त्रास वाढला की मी माझ्या पतीला सांगायचे. ते मला लगेच दवाखान्यात घेऊन जायचे. प्रत्येक वेळा पाचशे ते एक हजार रुपये खर्च व्हायचे. त्रास तात्पुरता कमी व्हायचा व परत वाढायचा. आर्थिक परिस्थितीपण जेमतेमच असल्याकारणाने महागडे औषधोपचार परवडत नव्हते. त्यातच माझ्या मुलीला डेग्यू झाला. दवाखान्यात दाखल करून पाच दिवस झाले पण फरक पडत नव्हता. अशा परिस्थितीमुळे माझा स्वभाव खूप चिडचिडा झाला, बारीक-सारिक गोष्टींवर राग यायचा रागात स्वतःला मनस्ताप करून घ्यायची. राग अजिबातच सहन होत नव्हता. त्यावेळी मी मुलीसाठी होमिओपॅथिक औषधोपचार सुरू केले. दोनच दिवसात ती बरी झाली. तेव्हा मी पण थायराॅइडसाठी होमिओपॅथिक औषधोपचार सुरू करायचे ठरवले.

होमिओपॅथिक औषधोपचार सुरू केल्यानंतर लगेच एकाच महिन्यात वरील सर्व त्रास पंचाहत्तर टक्के कमी झाला. राग व चिडचिड खूपच कमी झाले. तीन महिन्यांनंतर परत थायराॅइडची तपासणी केली व सर्व रिपोर्ट नॉर्मल आले.

मला होमिओपॅथिक डॉक्टरने थायराॅइडची गोळी बंद करण्यास व होमिओपॅथिक औषधी चालू ठेवण्यास सांगितले. परत आणखी चार महिन्यांनंतर थायराॅइडची तपासणी केली, तेव्हाही सर्व रिपोर्ट नॉर्मलच आले. म्हणजे थायराॅइडची गोळी सात महिने बंद होती व आजही बंदच आहे. मला आता कसलाच, कुठलाच व काहीही त्रास नाही. मी खूप आनंदी आहे. माझे पती म्हणतात की, “होमिओपॅथिक औषधी सुरू केल्यापासून माझ्या डोक्याचा फार मोठा ताण कमी झाला. माझ्या पत्नीच्या चिडचिड स्वभावामुळे घरातील शांतता जी नाहीशी झाली होती ती परत आली.” मी स्वतःला धन्य मानते व होमिओपॅथीचे आभार मानते, की ज्यामुळे मी पूर्णपणे बरी झाले.

सौ. मते शीला श्रीरंग,
औरंगाबाद. (मोबाइल न. 9403637134)
बातम्या आणखी आहेत...