आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Golden Jubilee Special Report By Sanjay Raut

सत्तेपेक्षा जनतेचे सुख-दुःख मोठे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचा
सुवर्णमहोत्सव, हा राज्य व देशातील ऐितहासिक क्षण आहे. प्रादेिशक पक्षाचे महत्त्व सेनेने आज साऱ्या देशाला पटवून िदले आहे. यासाठी िशवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देशातील सर्व प्रादेिशक पक्षांनी आभार मानायला हवेत. प्रादेिशक पक्षांना ताठ मानेने जगायला िशकवले, ते बाळासाहेबांनी! हा िनर्णय त्यांनी ५० वर्षांपूर्वी घेतला होता. जयललिता, ममता बॅनर्जी, मुलायम िसंह यांच्या पक्षासह पंजाबात अकाली दलाचे महत्त्व अधोरेखित होते, ते सेनेमुळे. त्या वेळी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी एक प्रादेिशक पक्ष स्थापन केला, म्हणून बाळासाहेबांवर राज्यातूनच नव्हे तर देशभरातून टीकेचे मोहळ उठले होते. पण, बाळासाहेब हे द्रष्टे नेते होते, हे पाच दशकानंतर िसद्ध झाले आहे.
आज बाळासाहेब हयात नाहीत, पण तेच िशवसेनाप्रमुख आहेत. त्यांची जागा यापुढे कोणी घेऊ शकत नाही. बाळासाहेब यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी आली, पण ते िशवसेना पक्षप्रमुख आहेत. सेनेने सत्तरीच्या दशकात भूमिपुत्रांमधील स्वािभमानच जागवला इतकेच नाही, तर त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न सोडवला. बँकांपासून ते िवविध आस्थापनांमध्ये मराठी माणसाला संधी िमळाली पािहजे, हे सेनेने पहिल्यांदा ठणकावून सांिगतले. त्यात परदेशी बँका, कंपन्याही होत्या. सेनेच्या स्थानीय लोकािधकार समितीमुळे तर एक पिढी सक्षम झाली. या िपढीच्या मुलांनी नंतर उच्च िशक्षण घेऊन उत्तरोत्तर प्रगती केली. सेनेने समाजकारणाचा जो वसा घेतला, त्याची ही फळे आहेत. सेनेने मराठी माणसांचा िवचार करताना िहंदुत्वाची भूिमका घेतली आिण ती इतरांप्रमाणे आपल्या फायद्या-तोट्याचा िवचार करून कधीच सोडली नाही. त्याचमुळे आज भारतात या पक्षाबद्दल कुतूहल आणि आपुलकी आहे. सत्ता असली काय िकंवा नसली काय, त्याचा बाळासाहेबांनी कधीच िवचार केला नव्हता. त्यांना सत्तेपेक्षा मराठी माणसांच्या सुखदु:खाशी कायम एकरूप राहायला आवडले. त्यामुळे बाळासाहेब हयात नसले तरी, सेेनेच्या रूपात ते आपल्या आसपास आहेत, हा िवश्वास त्यांना वाटत आहे. बाळासाहेब गेल्यानंतर सेनेचे काय होणार, अशी िचंता बऱ्याच जणांनी व्यक्त केली. पण, सेना आहे तेथे उभी आहे, भविष्यात आणखी माेठी भरारी घेणार आहे. कारण, आजही एखाद्या मुद्द्यावर सेनेची भूिमका काय आहे, याची उत्सुकता देशभरातील प्रसारमाध्यमांना आहे, यावरून या पक्षाचे महत्त्व अधोरेखित होते. उद्धव व आिदत्य ठाकरे बाळासाहेबांचे काम समर्थपणे पुढे नेत आहेत.
सेनेने मराठी माणसांचा िवचार करताना िहंदुत्वाची भूिमका घेतली आिण ती इतरांप्रमाणे आपल्या फायद्या-तोट्याचा िवचार करून कधीच सोडली नाही. त्याचमुळे आज भारतात या पक्षाबद्दल आपुलकी आहे.