आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यातील ज्येेष्ठता व नवोदितांची गळचेपी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहित्य हा समाजाचा आरसा असते. “साहित्यिक’या विविध कलांचा अथांग पाईक असतो. साहित्य ही कला असते. त्यातुन नवनिर्मिती करणं. सौंदर्य निर्माण करणं. नवविचार मांडणं. नवतत्व शोधून काढणं. त्यातुन मानवी जगण्याला अधिक बळकट करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य साहित्यिक करत असतो. साहित्यात प्रत्येकाला जगावसं वाटतयं. तसा प्रयत्नही केला जातो. साहित्याला तसं वय, वेळ, भाषा, काळ, मुळीच नसतो. परंतु, निर्मिती करणाऱ्या साहित्यिकास ही बंधन असतात. “प्रत्येक क्षेत्रात जसं लहान मोठेपण असतं, तसं साहित्य क्षेत्रातही असतं. कुणाचं साहित्य हे उत्तम दर्जाचं असतं. तर कुणाचं अगदी तकलादू....पण साहित्य हे साहित्यचं असतं. “या साहित्य क्षेत्रात आता बरीच मंडळी जेष्ठ, प्रस्थापित होऊन बसलेली आहे. स्वत:च्या नावापुढे “जेष्ठ साहित्यिक’ असा शब्दप्रयोग करण्याची नवं प्रथाचं साहित्य क्षेत्रात निर्माण झाली.

जेष्ठ साहित्यिकांची जेष्ठता जेव्हा अनेक विचारपीठावर पाहावयास मिळते. तेव्हा त्यांचं कौतुक करावसं वाटतं. त्यांच्या लेखनात तोच तोपणा सतत आढळून येतो. (नाविण्य सादर करणाऱ्या साहित्यिकांना वंदन) यापेक्षा अनेक नवोदित साहित्यिक अधिक उत्तमपणानं दर्जेदार लिखाण करताना दिसतात. पण, त्यांची फारशी दखल घेतली जात नाही. त्यांची शैली, कल्पकता, सत्यता, नवनिर्मिती प्रत्येकास भुरळ घालते. नवं नव्या कल्पना, संकल्पना त्यांच्या विचार कक्षेतून बाहेर पडत असतात. अस्सल प्रस्थापितांना कोड्यात पाडेल अशी त्यांची नवनिर्मिती असते. परंतु, या जेष्ठ मंडळीला त्यांच नवोदितपण सहन होत नाही. पर्यायी अशा या नवोदितांची विनाकारण बदनामी केली जाते. नको असलेले, प्रतिमा मलिन करणारे आरोप लावून ही प्रस्थापित मंडळी आनंदाने घडणाऱ्या प्रसंगाचा आस्वाद घेत असतात. यास लिखित असा कुठलाही सर्वमान्य पुरावा नसला तरी ते तितकचं सत्य आहे. ते आपणास नाकारता येणार नाही.

अनेक नवोदित साहित्यिकांना या जेष्ठ साहित्यिकांनी संधी निर्माण करून द्यायला हवी. त्यांना हक्काचं असं विचारपीठ उपल्बध करून द्यायला हवं. परंतु, तसं घडताना दिसत नाही. एकही नवोदित साहित्यिक मी घडवला असं ठामपणे कुठलाही साहित्यिक सांगू शकत नाही. (नवोदितांना घडवणाऱ्या साहित्यिकांना सलाम)

साहित्य हि कुणाचीही मक्तेदारी नाही. प्रत्येकानी साहित्य निर्मिती करावी. नवोदित - जेष्ठ अशी भेदभावाची कल्पना करून साहित्यास अडचण निर्माण करू नये. ज्ञानकक्षा अधिक रुंद करून प्रत्येक नवोदितांनी आपलं साहित्य नव्या विचारानं, नव्या उमेदीनं जगासमोर मांडावं.
बातम्या आणखी आहेत...