आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखाचित्रे : प्रदीप म्हापसेकर - Divya Marathi
रेखाचित्रे : प्रदीप म्हापसेकर
भावनेचं रूप घेऊन शब्द कागदावर अवतरतात. भावनांच्या लडीतून कथाविश्व आकारास येत जातं. या विश्वाची काही वैशिष्ट्यं असतात. ती कधी दीर्घकथेतून उलगडतात, कधी लघुकथेतून. परंतु अत्यल्प शब्दांत अवघे विश्व सामावलेली कथा आपल्याला निराळ्या रूपात भेटते. एकदा भेटली की, कायमस्वरूपी आपली होऊन जाते. अशाच वाचकमनांवर प्रभाव टाकणाऱ्या लघुत्तम कथांना व्यासपीठ देणारे हे पाक्षिक सदर...

बटन
पंचायत समितीच्या मतदानाचा दिवस.
सुसाबाईच्या खोपटासमोर मोटारसायकल थांबली.
‘ये सुसा मावशे, चल की मताला. गाडीवर न्हीतू. बस पटदिशी.’
‘कशाला मला थिरडीला गाडी न् घुडी. माजं पाय मजबूत हायंत आजून, सांग जा त्या इंदरवानाला.’
‘ज्याचं करावं बरं ते म्हंतय, माजच खरं. ये बाई चालत. तुला कोण हात्ती घोडं द्यायचंय.’ असं म्हणून गाडीवानानं गाडीवर टांग टाकली.
‘या बाईलभाड्याला गाडीवर बसवून दवाखान्यात न्ह्यायचं म्हायती हाय का, आयबापाला. आताच बरा पुळका आला गाडी पाटवायचा. कधी कोर कुटका द्यायचा माह्यती न्हाय. पंदरादी झालं, गाव जिवू घालतूय. किती बकरी कुकरी कापली, याची गिणती बी नसल. गावातल्या वळूवांच्या मोटारीमधी पाच-पाच लिटर तेल वततूय. बापाचं धोतर फाटल्यालं दिसत नाय त्याला. डोळं फुटलं आसत्यालं.
त्या फुकनगांडीनं बी आठ धा गाव पालती घातल्याती चार दिसात. समद्या गावाचं पाय धरतीय चंडकी. सासू-सासऱ्याला तोंडावर च्याचं काळं पाणी फेकत नाय कधी. आन् गावातलं टगे पिवून लास हायतं, ह्यानी फेकल्याल्या बाटल्यावर.
तरीबी जीव ऱ्हात नाय.
बटन तर त्याच्याच नावाफुडचं दाबावं लागतय.
आईची माया अन् जाती गू खाया.’
सुसाबाई रस्त्यानं जाताजाता
स्वतःशीच बडबडत होती...
 
पुढील स्‍लाइडवर...मांजर
 
लेखिकेचा संपर्क: ९९२३९००७२८ 
kavitananaware3112@gmail.com
 
 
बातम्या आणखी आहेत...