आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी लघुत्तम कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनेचं रूप घेऊन शब्द कागदावर अवतरतात. भावनांच्या लडीतून कथाविश्व
आकारास येत जातं. या विश्वाची काही वैशिष्ट्यं असतात. ती कधी दीर्घकथेतून उलगडतात, कधी लघुकथेतून. परंतु अत्यल्प शब्दांत अवघे विश्व सामावलेली कथा आपल्याला निराळ्या रूपात भेटते. एकदा भेटली की, कायमस्वरूपी आपली होऊन जाते. अशाच वाचकमनांवर प्रभाव टाकणाऱ्या लघुत्तम कथांना व्यासपीठ देणारे हे पाक्षिक सदर...
 
१.
शरीर ठणकत होतं. उन्हातानाचं असं नाचू नये, सगळे सांगतात. ते ऐकायला पाहिजे, असं त्याला वाटलं. तरी दिवस निघून गेला होता. पुन्हा संध्याकाळ आलेली होती. अगदी टोचत राहणारी संध्याकाळ उभी होती आणि पुढे अख्खी रात्र. रात्रीचं एक बरं असतं, झोप लागली की, सरळ सकाळ होते. पण संध्याकाळचं तसं नसतं, असं त्याला उगाच वाटत राहायचं. मोगऱ्याला आजही गंध नव्हता, कदाचित तो नसतोच. त्यालाच एकदा मागे आला म्हणून तो दर उन्हाळ्यात त्या वेलाकडे आशेने बघायचा, पण मोगऱ्याचा गंध नव्हता. तो घरात परतला. घर दिवसभर रिकामं असल्याने गरम झालं होतं. घर कसं भरलेलं असलं की, गारवा राहतो. रिकामं काहीच, कुणीच राहू नये, सर्वांनी भरभरून द्यावं-घ्यावं, पाणी साचू देऊ नये, जीव साचू देऊ नये, माणसं साचू देऊ नये, घाम साचू देऊ नये, निसर्गनियमाने सगळं प्रवाहित व्हावं कायम. असे भयंकर आशावादी विचार मनात घर करत असतानाच तो थंडगार पाणी प्याला. थंड पाणी ग्रेट आहे. हे नसतं, तर हे गर्मीचे दिवस म्हणजे अगदीच कठीण झाले, असते, असा त्याला वाटलं. इतक्या गर्मीमध्ये लग्न करणाऱ्यांचं त्याला कायम नवल वाटायचं. खूप रुक्ष वातावरणातही लोक पारंपरिक लग्नाच्या अट्टाहासाने पेटलेले वाटायचे, कुणाची वरात मोठी यावरही स्पर्धा असायची. पण त्याला नाचायला आवडायचं. त्याच्या अस्वस्थ आयुष्यात ही एक स्वस्थ करणारी गोष्ट होती. पुढचं पुढे...
 
आणखी काही लघुकथा...पुढील स्‍लाइडवर..
 
preshitsiddhabhatti2@gmail.com
लेखकाचा संपर्क - ८९८३२६७०१५    
रेखाचित्रे : प्रदीप म्हापसेकर
बातम्या आणखी आहेत...