आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईस्क्रीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझा लेक स्वरोम. वय वर्ष तीन. संध्याकाळची वेळ होती. आज मूड फार फ्रेश होता. सायकलवर बसून गोल गोल चकरा चालू होत्या. मी शेजारी बसून भाजी निवडत होते. खेळता खेळता अचानक येऊन मला म्हणाला, आई, चल माझ्या सायकलवर बस. आपण फिरायला जाऊ.
 
मी हातातले काम बाजूला ठेवून सायकलवर बसण्याचे भासवत त्याच्या पाठोपाठ गेले. आपल्याला कुठे जायचे पण? असे विचारताच गाडी आईस्क्रीमच्या दुकानापर्यंत पोहोचली. घरातच एका खोलीत गाद्या ठेवल्या होत्या. ते म्हणजे आमचे आईस्क्रीम शॉप.
 
गाडी पार्क करत दुकानदाराला, “ओ काका, आम्हाला दोन आईस्क्रीम द्या,’ अशी ऑर्डर देऊन झाली. मिटक्या मारत मारत आईस्क्रीम खाऊन झाल्यावर शेजारच्या डस्टबिनमध्ये कागद फेकून दिला आणि खिशातून काढून काकांना पैसे देऊन टाकले. आमची स्वारी पुन्हा गाडीवर घराकडे रवाना झाली. मला बैठकीत सोडून दिले.
 
 पण कपाळाला हात लावून बोलला, “अले, चॉकलेत खायचं विशरलो ना आपन. तू इथंच थांब मी जातो पतकन.’ सगळं काही खाऊन झाल्यानंतर फोन लावून पप्पांना इतिवृत्त कळवलं. चॉकलेट अन् आईस्क्रीम लहान मुलांच्या आवडत्या गोष्टी. त्या कशा मिळवायच्या, कशा खायच्या, या गोष्टी भावविश्वात पाहणारी आजच्या पिढीची कल्पनाशक्ती कुठपर्यंत जाऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळाले. अवघ्या तीन वर्षांत प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर त्याने खाऊ घातलेले आईस्क्रीम आईला नेहमीपेक्षा अधिक गोड लागले.

 
बातम्या आणखी आहेत...