डाॅ. अांबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व व कार्यकर्तृत्वाचा शब्दांिकत जीवनपट म्हणजे राष्ट्र उभारणीचे सम्यक दर्शनच असल्याची जाणीव ‘समग्र बाबासाहेब’ या ग्रंथातून वाचकांना होईल. भारतीय लोकशाहीच्या प्रारूपातील ‘सामाजिक न्याय’ तत्त्वाची संकल्पना म्हणजे सामाजिक लोकशाहीचा नवा िसद्धांत कसा अाहे, जागतिकीकरणाच्या कोलाहलात निर्माण झालेल्या नव्या प्रश्नांना सामोरे कसे जायचे, या संदर्भात ग्रंथातून भूमिका व्यक्त होत नसली तरीही बाबासाहेबांच्या तत्त्वचिंतक विचारांमधून तर्कसंगतपणे अाजच्या प्रश्नांना कसे िभडावे अन् उत्तरे शोधून मार्गक्रमण करावे, असा गर्भित मौलिक संदेश हा ग्रंथ देत अाहे. शेती अािण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भातील बाबासाहेबांची मते, लोकशाही अािण जीवनपद्धती, समाज िनयंत्रणासाठी राजसत्तेची कायदेशीर जबाबदारी, समाजाच्या सांस्कृितक जडणघडणीसाठीचे नवबौद्धायन अशा विविध ४७ िवषयांमधून बाबासाहेबांच्या विविध पैलूंचा खजिना एकाच ग्रंथामधून अभिव्यक्त होत अाहे.
दुष्काळ अािण दािरद्र्याच्या संकटात सापडलेली शेती नि शेतकऱ्यांसाठी पर्यायी समूहशेती, शेतजमिनीवर सरकारी मालकी असावी, शेती उद्योग, पाटबंधारे, िवत्त व अौद्योगिक क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी समाजवादी प्रारूप राबवून नैसर्गिक साधनसंपत्तीवर सामूिहक मालकी कशी प्रस्थापित करावी, लोखंड, इंधन, तेल, जल, ऊर्जा, वायू निर्मिती यांसारखे मूलभूत उद्योग हे सरकारी मालकीचे का असावेत, याबाबत बाबासाहेब कसे अाग्रही होते. देशात सामाजिक क्रांती घडवून अाणण्यासाठी प्रातिनिधिक सरकारची संकल्पना, अनुसूिचत जाती-जमाती, अल्पसंख्याक समाजाच्या िहतासाठी राजकीय सत्ता हाती घेण्याचा त्यांचा संदेश. बंदिस्त जात ही राष्ट्राच्या उभारणीतील प्रमुख अडथळा असल्याने ितच्यावर केलेला हल्ला, स्त्री-पुरुष समानता, सर्वांना िशक्षण, संसाधनाचे फेरवाटप, धर्मचिकित्सा व कायद्याचा हस्तक्षेप, अांतरजातीय िववाहांना प्रोत्साहन असे नव भारताच्या उभारणीसंदर्भाने बाबासाहेबांचे िवविध िवषयानुरूप योगदान लेखकांनी ग्रंथातून मांडले अाहे. राजकारणात संवैधािनक नैतिकता, लोकनिष्ठा, विरोधी पक्षाचे अस्तित्व, भाषावार पुनर्रचना यांसह िशक्षण, अर्थ, कायदा, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजवाद, शेती, संरक्षण, िवज्ञान, इतिहास, धर्म िचकित्सा अशा सर्वच िवषयांतील त्यांची मांडणी काय होती? प्रभावी लोकसंवादक, घटनाकार, नवभारताचे िशल्पकार, अादर्श लोकप्रतििनधी, बहुजनवादी पत्रकार, कामगार नेते, परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक, धर्मसुधारक, महिलांच्या लढ्याचे अग्रदूत अशी बाबासाहेबांची अोळख कशी निर्माण झाली? नेहरूंच्या अलिप्तवादी धोरणास िवरोध का होता? गौतम बुद्ध हेच इंिडयन फेमिनिझमचे उद्गाते कसे? कायदा हा समाज परिवर्तनाचे माध्यम कसा बनतो? ‘जात’ ही स्वयंमर्यादित वर्ग कशी बनली? भारतीय दर्शनात बुद्ध-लोकायतचा तर जागतिक संदर्भात बुद्ध िन मार्क्सचा समन्वय कसा अाहे? खासगी मालकीमुळे एक वर्ग सत्ताधीश दुसरा िनर्धन कसा होतो? ते पुणे करार, िहंदू कोड बिल या िवषयांवरील लेखांनी या ग्रंथाची संशोधन उंची वाढवली अाहे. प्रा. डाॅ. एम. डी. िशंदे यांचा सोलापुरातील अांबेडकरी चळवळीचा अाढावा घेणारा लेख उत्तम अाहे. हा ग्रंथरूपी दस्तएेवज संशोधक िवद्यार्थी, चळवळीचे अभ्यासक, पत्रकार, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांना उपयुक्त ठरेल.
या ग्रंथातील लेखांसाठी लेखक, िवषय, साधन संदर्भांची सजगता ग्रंथ संपादनकार बाळासाहेब मागाडे यांनी उत्तमपणे साधली अाहे. शहाजी गडहिरे यांच्यासारख्या गावपातळीवरील प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यापासून ते प्रा. हरी नरके यांच्यापर्यंतच्या संशोधक, लेखक व अभ्यासकांना एकाच ग्रंथातून वाचण्याची संधी वाचकांना उपलब्ध झाली अाहे. प्रा. प्रदीप अागलावे, डाॅ. गिरीश जखोटिया, डाॅ. डी. टी. गायकवाड, डाॅ. शैलेंद्र देवळाणकर, डाॅ. रूपा कुलकर्णी, डाॅ. नितीन नवसागरे, पत्रकार अरुण खोरे, मधू कांबळे, दयानंद माने, माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, श्रीमंत कोकाटे, ज. िव. पवार, डाॅ. यशवंत भंडारे, डाॅ. प्रदीप गोखले, प्रा. िसद्धोधन कांबळे, संजय सोनवणी, डाॅ. गौतम कांबळे, राजेंद्र गणोरकर, दत्ता गायकवाड,
प्रा. एम. डी. िशंदे, कृष्णा इंगळे, प्रा. िवधीन कांबळे यांच्या सहज सोप्या भाषेतील लेखन कौशल्यामुळे अनेक तात्त्विक, िचकित्सक विषय सामान्य वाचकांना समजून घेणे शक्य झाले अाहे.
नव्या लढाईसाठीचा ‘फिलाॅसाॅफर’
बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी केंद्र शासनाने सहासूत्री कार्यक्रमाची घोषणा केली अाहे. दुसरीकडे संकुिचत राष्ट्रवादाचा बोलबाला सुरू अाहे. भारत माता की जय म्हणणार नसाल तर देश सोडून जा, हे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचे फर्मान. समाज संतुलनासाठी कायदे करून हस्तक्षेप करण्यापेक्षा अस्तित्वात असलेले कामगार अािण तत्सम कायदे रद्द करण्यासाठीची पंतप्रधानांची कृतिशीलता. तरुणाईवर राष्ट्रद्रोहाचे खटले करून िवचारस्वातंत्र्याची सुरू असलेली गळचेपी. अशा वेळी डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांना अभिप्रेत असलेली सामाजिक व अार्थिक लोकशाहीची संकल्पना, राष्ट्रवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, िशक्षणहक्क अािण समाजातील अार्थिक िवषमता कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी सुचवलेल्या उपायांची जणू उजळणीच ‘समग्र बाबासाहेब’ हा महाग्रंथ करून देतो.
समग्र बाबासाहेब
संपादन : बाळासाहेब मागाडे
प्रकाशक : थिंक टँक पब्लिकेशन्स्, सोलापूर
पृष्ठसंख्या : ४४४
मूल्य : ~ ४५०/-
shrikant.kamble@dbcorp.in