आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तम सादरीकरणासाठी अपडेट राहणे आवश्यक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काम आणि नोकरीत आपली प्रासंगिकता जपण्यासाठी आवश्यक आहे नव्या गोष्टींसह स्वत:ला अपडेट ठेवणे. यात उद्योगातील बदलत्या प्रवाहानुसार आपल्याला स्किल अपडेट ठेवण्यात मदत मिळेल. आता पूर्वीसारखी गोष्ट राहिलेली नाही. तेव्हा लोक आपले पूर्ण करिअर एकच काम, नोकरी करत घालवत होते. भविष्यात आणि वर्तमानकाळातदेखील बहुतांश करिअर सातत्याने बदलाची मागणी करतात. येथे काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण स्वत:ला सातत्याने अपडेट ठेवू शकाल.

बातम्या तपासत राहणे
आपण यासाठी आपल्याच पसंतीनुसार प्रिंट वा ऑनलाइन मीडियाची निवड करू शकता. न्यूजपेपर, मॅगझिन, संपादकीय आणि ब्लॉग वाचू शकता. आपल्या जवळपास होणाऱ्या गोष्टी वा ज्या गोष्टी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे प्रभावित करतात, त्यांच्याकडून सावध सूचित माहिती होणे कधीही उत्तमच आहे. उदा. विमुद्रीकरणाचा निर्णय एक मोठा बदल होता आणि याचा प्रभाव आमच्या अर्थव्यवस्थेवरही होईल. आपण आपल्या पसंतीच्या बातम्या वाचण्यासाठी गुगल अलर्टची निवड करू शकता. यामुळे आपल्या मेलवर प्रतिदिनी त्या टॉपिकशी संबंधित बातम्या येतील. याशिवाय आपल्या कार्यालयाची कार्यशैली आणि वातावरणात होणाऱ्या बदलाची माहिती असावी.

परिषदा, कार्यशाळांत सहभाग घ्या : परिषदा आणि कार्यशाळा आवश्यक कौशल्य शिकण्यात मदतगार होऊ शकतात. यांच्या माध्यमातून अन्य लोकांच्या अनुभवातूनही शिकण्यासारखे असते. हेदेखील सुनिश्चित करा की, परिषदेदरम्यान आणि नंतरही परिषदांमध्ये सहभागी होणाऱ्या अन्य लोकांशीही बोला, जेणेकरून या अनुभवाला आणखी उत्तम बनवू शकता. संबंधित विषयांतील सेमिनारदेखील आपल्या सध्याच्या माहितीकोशाला वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरू शकते. यात नवे तंत्र आणि प्रवाहाची माहिती मिळू शकते, जी कामाच्या पद्धतीला उत्तम करण्यात सहायक होऊ शकते.

पुस्तके वाचणे
आपल्या क्षेत्रातील संबंधित नेते वा लेखकांच्या विचारास समजून घेण्यासाठी बेस्टसेलर पुस्तकांची निवड करावी लागेल, जी आपणास काही शिकवू शकतील. उदाहरणासाठी जर आपण मार्केटिंग क्षेत्राशी जोडले गेलो आहोत, तर अशा पुस्तकांची निवड करू शकाल, ज्यात पोझिशनिंग, मार्केटिंगमध्ये तांत्रिकतेचा उपयोग कसा करायचा आहे, जागतिक प्रवाह काय आहे आणि ग्राहकांचा विचार कसा आहे, याबाबत माहिती घेऊ शकाल. यात आपल्या विचारांना नवा आयाम मिळेल.

आशय याचा शेवटी हाच आहे की, आपल्याला ट्रेनिंग देणे पूर्णपणे फक्त आपल्या एम्प्लॉयरचीच जबाबदारी नसते. तर ही आपलीही जबाबदारी आहे की आपण नव्या कौशल्यासह अपडेट राहा. बदलत्या तंत्राची माहिती ठेवा आणि त्यास
व्यवहारात आणा.

श्वेता रैना
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या पदवीधर.
बातम्या आणखी आहेत...