आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंगल सिटिंग रूट कॅनॉल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगल सिटिंग रूट कॅनॉल करणे म्हणजे एकाच दिवशी रूट कॅनॉल सुरू केले म्हणजे त्याच दिवशी फिलिंग संपवणे. आता बायोटेक्नॉलॉजीचा जमाना आहे. हेड फायलिंगची जागा आता मशीन ड्रिव्हन रूट कॅनॉलने घेतली आहे. सगळे जगच फास्ट झाले तर ट्रीटमेंट्स का नाही?
एकाच दिवशी रूट कॅनॉल सुरू करून त्याच दिवशी त्याचे फिलिंग करणे तत्त्वत: अशक्य नसले तरी व्यवहारात तेवढे शक्य होत नाही. त्यामध्ये येणा-या अडचणी अशा :
1) वन सिटिंग रूट कॅनॉलमध्ये मुख्यत: दाताला किंवा दाढेला झालेल्या गळवाचा म्हणजे पेरिअपायकल इन्फेक्शनचा संपूर्ण निचरा झाला की नाही याची खात्री देता येत नाही. म्हणजे जर कुणाला दाढ किडल्यामुळे सूज आली असेल तर त्या दाताची रूट कॅनॉल एका दिवसात होऊ शक त नाही. पूर्ण सूज नाहीशी झाल्यावरच ती ट्रीटमेंट संपू शकते.
2) शिवाय एकाच दिवशी सुरुवात व फिलिंग म्हणजे शेवट करावयाचा झाल्यास लागणारा वेळ साधारण दीड ते दोन तास असतो. तेवढा वेळ पेशंटची बसण्याची तयारी असावी. डॉक्टरांनाही इतर पेशंटमधून तेवढा वेळ मिळावा.
3) काही जणांना भीती वाटते त्या ठिकाणी कमी वेळाच्या 2-3 वेळा सिटिंग घेणे जास्त सोयीस्कर असते.
4) ज्यांना जबड्याचे किंवा जबड्याच्या सांध्याचे विकार किंवा प्रॉब्लेम असतील तर त्यांना एकाच दिवशी ट्रीटमेंट करणेही अवघड असते.
5) एकाच दिवशी ट्रीटमेंटमध्ये कन्फामेंटरी टेस्ट घेता येत नाही. ती 2-3 दिवसांच्या सिटिंगमध्ये क्लोज ड्रेसिंग देऊन घेता येते.
पण ही झाली काही अपवादात्मक उदाहरणे मात्र जेव्हा दाताला सूज आलेली नसते किंवा समोरचा दात अपघातामध्ये तुटलेला असल्यास, त्या दाताची नस उघडी पडलेली असल्यास अशा दाताचे रूट कॅनॉल त्याच दिवशी सुरू करून संपविता येते. कॉस्मेटिक ट्रीटमेंट्समध्ये जर एखाद्या पुढे आलेल्या समोरच्या पटाशीच्या दाताचे रूट कॅनॉल करावयाचे झाल्यास एकाच दिवशी करता येते.
मात्र काही पेशंट एक-दोन सिटिंगनंतर दुखणे थांबल्यामुळे ट्रीटमेंट अर्धवट सोडतात. दवाखान्यात येण्याचे टाळतात. अशा प्रकारच्या पेशंटसाठी सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ही एक पर्वणीच आहे.