Home | Magazine | Madhurima | skin-care-changing-season

त्वचेची निगा व बदलते ऋतू

माया परांजपे, सौंदर्यतज्ज्ञ | Update - Jun 10, 2011, 03:08 PM IST

ब्युटी पार्लर हा प्रकार खेड्यापाड्यातल्या गल्लीबोळात पोहोचायच्या अनेक वर्षे आधी, तब्बल 45 वर्षांपूर्वी, माया परांजपे यांनी ब्युटिक हे पार्लर मुंबईत खार येथे सुरू केले...

 • skin-care-changing-season

  ब्युटी पार्लर हा प्रकार खेड्यापाड्यातल्या गल्लीबोळात पोहोचायच्या अनेक वर्षे आधी, तब्बल 45 वर्षांपूर्वी, माया परांजपे यांनी ब्युटिक हे पार्लर मुंबईत खार येथे सुरू केले. हा प्रवास उत्तरोत्तर अधिकाधिक महिलांना सुंदर करत आणि त्यांना सौंदर्यसाधना शिकवत आजही सुरू आहे. 67 वर्षांच्या मायाताई आजही आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्याचे काम करतात. हेअरकट करताना त्यांचा झपझप चाललेला हात आपल्याला स्तिमित करतो. याच मायाताई घेऊन आल्या आहेत सौंदर्य राखायचे कसे, यासाठी काही खास टिप्स.

  आपल्याकडला हिवाळा लवकर संपतो; मात्र उन्हाळा कधी संपतो याची आपण वाट पाहत असतो. मेमधला उष्मा शरीराच्या आतून आणि बाहेरून त्रास देतो. शारीरिक तापमान बाहेरच्या तापमानाबरोबर बदलते आणि पचन, उत्सर्जन वगैरे क्रियांवर त्याचा परिणाम होतो. बºयाच नाजूक प्रकृतीच्या स्त्री-पुरुषांना याचा त्रास होतो आणि त्याचा दृश्य परिणाम त्वचेवर दिसू लागतो. मराठवाड्यासारख्या प्रदेशात कोरड्या त्वचेवर उन्हाने रापलेला रंग येतो आणि थंडीसारखे ओठ व पाय फुटतात. हा परिणाम कोरड्या त्वचेपेक्षा मिश्र व तेलकट त्वचेवर अधिक होतो. त्वचेवरील तैलग्रंथी उत्तेजित झाल्यामुळे तैलग्रंथींमधील सीबम वाढते. त्यामुळे ब्लॅकहेड्स, बारीक पांढरे पुरळ, पुटकुळ्या व अ‍ॅक्ने यांचा त्रास होऊ लागतो. कौमार्यावस्थेतील मुलामुली याच काळात पोहायला जातात, सायकल चालवतात, उन्हात खेळतात. तसेच सुटीमुळे घरी चमचमीत खाणे होते. या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे वरील दोष अधिक वाढतात. त्यावर उपाययोजना न झाल्यास चेहºयावर डाग, व्रण, निस्तेज त्वचा कायम राहतात. त्वचेवर यासाठी तेल काढून टाकणारे व तेल कमी करणारे लेप व लोशन्स लावणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या स्निग्ध पदार्थांचा वापर करू नये वा तेल, क्रीम, मेकअपही फार वापरू नये.

  क्लिन्सिंग
  त्वचा सतत साफ ठेवण्यासाठी तेलरहित क्लिन्सिंग लोशनचा वापर करावा. तसेच अंघोळीसाठी खूप सुगंधी साबणही सतत वापरू नये. पुटकुळ्या व अ‍ॅक्ने असणाºयांनी औषधी साबण वापरावा. याशिवाय स्टार्चचा पॅक लावल्याने त्वचेचा स्निग्धपणा कमी होतो. म्हणजेच घरात असलेल्या कोणतेही पीठ पाण्यात कालवून त्यात लिंबाच्या रसाचे दोन- तीन थेंब घालावेत. याचा अंघोळीच्या आधी चेहºयावर लेप लावून संपूर्ण वाळल्यावर गरम पाण्याने धुऊन टाकावे. चणा, मका, मसूर, धुतलेले तांदूळ, साबुदाणा, आरारूट यांपैकी कशाचेही पीठ वापरू शकतो. ज्यांना फार मुरमे असतील त्यांनी जांभळाची बी उगाळून त्याचा लेप त्यावर लावावा.

  फळांचा उपयोग
  कोरड्या त्वचेलाही उन्हाळ्यचा वा उष्णतेचा त्रास होतो. त्वचेतील बाष्प किंवा आर्द्रता कमी होते व त्वचेवरील रंगकण वाढतात. ते सर्वत्र वाढले तर त्याला टॅन म्हणतात. पण नाकावर किंवा गालावर रंगकणांचे प्रमाण वाढले तर त्याला पिगमेंटेशन म्हणतात. रोज बाहेर जाण्यापूर्वी कोरड्या त्वचेवर टोनिंग म्हणून व्हायटनिंग क्रीमचा वापर करावा. हे क्रीम अगदी हलक्या हाताने चेहºयावर लावावे, चोळू नये व नंतर त्यावर पावडर वा मेकअप करावा. कोरड्या त्वचेवरही आपण या मोसमात तेलाचा किंवा क्रीमचा मसाज करू नये. टरबूज, खरबूज, कलिंगड, काडी, दुधी यांचा गर वा रस चेहºयावर लावल्यास त्वचेला उजाळा मिळतो. वेळ मिळेल तसा गर वा रस चेहºयावर लावावा, वाळल्यावर थंड पाण्याचे धुऊन टाकावे. यामुळे त्वचेचा रुक्षपणा कमी होतो.

Trending