आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smita Kelkar About After 10 Th Carrier Article India

दहावी-करिअरची नामी संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहावी दहावी दहावी. इयत्ता दहावी जवळ आली की, आपल्याला एक विचित्र भीती वाटायला लागते. एक विचित्र भीती. वर्षाच्या सुरुवातीला ही भीती जरा कमी असते, परंतु जसजशी परीक्षा जवळ येते तसतसे आपल्या भीतीचे प्रमाण वाढतच जाते. विद्यार्थांबरोबर त्यांच्या पालकांचीही स्थिती अशीच असते. असे म्हणायला हरकत नाही की विद्यार्थ्यांपेक्षा पालकच जास्त चिंताग्रस्त आढळून येतात. लहानपणापासून आपण परीक्षा देत आलेलो असतो, तेव्हा आपल्याला भीती वाटत नाही. मग दहावीतच का? दहीवीचीच परीक्षा महत्त्वाची का असते? दहावीचेच टक्के अतिशय महत्त्वाचे का असतात? सर्वात प्रथम हे जाणून घेणे आवश्यक आहे, कारण वर्षभर तुम्ही घेणार्‍या मेहनतीपाठच कारण जर तुम्हाला समजेल तर तुम्ही जास्त जिद्दीने, आत्मविश्वासाने अभ्यास करू शकाल.

दहावी हा शालेय शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा असतो. पुढील उच्च शिक्षणाची एक प्रकारे पहिली पायरीच. करिअरची खर्‍या अर्थाने सुरुवात होत असते ती दहावीपासूनच. दहावी ही करिअर टप्प्यातील तुमची पहिली पायरी असते, ते दोन कारणास्तव. पहिले कारण म्हणजे ज्या करिअरक्षेत्रात तुम्ही करिअर करू इच्छिता, त्या क्षेत्राचा प्रवेश हा तुमच्या दहावीच्या टक्क्यावर अवलंबून असतो. दुसरे कारण म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करून, तुम्ही तुमच्या क्षेत्रात नोकरी शोधण्यासाठी जाल, तेव्हा तुमचे दहावी, बारावी व ग्रॅज्युएशनचे टक्के गृहीत घेतले जातात. थोडक्यात तुम्ही पाहिलेली करिअरची स्वप्ने साकार होताना दहावीच्या टक्क्यांचे एक महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे. पूर्ण वर्षभर, परीक्षेपर्यंत तुम्ही पूर्वनियोजित पद्धतीने अभ्यास कसा कराल, परीक्षेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कोणता असेल यावर तुमच्या परीक्षेचा निकाल मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे. बोर्डाची परीक्षा असल्यामुळे थोडीफार भीती वाटणे हे साहजिकच असते, परंतु अनावश्यक भीती बाळगू नका. परीक्षा ही विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी नसते. आजच्या स्पर्धेच्या युगात स्वत:ला आजमावण्याची, परीक्षाही एक नामी असते. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. अभ्यासाद्वारे जी नवनवीन माहिती आपल्याला मिळत असते, जे नवनवीन ज्ञान मिळत असते, ते आपण योग्य प्रकारे आकलन करावे यासाठी परीक्षा असते. म्हणजेच परीक्षा ही स्वत:च्या विकासासाठी, प्रगतीसाठी असते. तेव्हा परीक्षेकडे नकारात्मक दृष्टीने किंवा भीती म्हणून बघू नका. वर्षभर दिवसरात्र मेहनत घेऊन नवनवीन ज्ञान आत्मसात करा आणि ते ज्ञान लेखणीच्या रूपाने उत्तरपत्रिकेत जास्तीत जास्त आणि योग्य प्रकारे कसे ओतता येईल याकडे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करा. आता दिवस आले आहेत ते कसोटीचे. कोणताही सैनिक योग्य प्रशिक्षण व सरावाशिवाय रणांगणावर उतरत नाही. प्रशिक्षण घेऊन त्यात तरबेज होतो व शत्रूवर विजय मिळवतो. तुम्हालाही रणांगणावर म्हणजे परीक्षेत उतरण्यापूर्वी प्रशिक्षण मिळवून त्यात तरबेज व्हायचे आहे. योग्य सरावाद्वारे सुसज्ज व्हायचे आहे. मग परीक्षारूपी रणांगणावर तुम्हाला भरघोस यश मिळेलच मिळेल. वेळेचे योग्य नियोजन, काटेकोर अभ्यास, योग्य आहार व झोप याचे योग्य समीकरण तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवेल.
(smit.kelkar@gmail.com)