आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्या क्षमता ओळखा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभावी पद्धतीने अभ्यास केला गेला तर आपल्या टक्केवारीत फरक पडतोच. प्रभावी पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे नक्की काय? तर अशा अभ्यासाच्या पद्धतीचा अवलंब करणे जी आपल्याला अनुकूल आहे. अशी पद्धत, जी ‘विद्यार्थी’ म्हणून आपल्यात असलेल्या क्षमतांचा पुरेपूर फायदा घेत आपल्याला उत्कृष्ट विद्यार्थी बनवते.

‘उत्कृष्ट विद्यार्थी’ बनणं कोणाला नाही आवडत, सर्वांनाच वाटत असते की परीक्षेत भरपूर टक्के मिळवावेत. सर्वांकडून आपले कौतुक व्हावे. चला तर मग समजून घेऊ की उत्कृष्ट विद्यार्थी बनण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी नीट समजावून घेऊन त्याचा कटाक्षाने वापर केला गेला पाहिजे.

१)आराखडा तयार करा : अभ्यासकधी, कसा, किती वेळेत पूर्ण केला पाहिजे याचा आराखडा आखला गेलाच पाहिजे. कारण हा आराखडाच तुम्हाला तुमचे उद्दिष्ट गाठण्यात मदत करणार आहे. यशापर्यंत पोहोचवणार आहे. आराखडा आखला गेला की प्रत्येक विषयाचा अभ्यास वेळेच्या आधीच पूर्ण होतो. शेवटच्या क्षणात धावपळ उडत नाही, त्याचबरोबर रिव्हिजन म्हणजेच सरावासही तुम्हाला भरपूर वेळ देता येतो. कारण अभ्यासाबरोबर सरावही तितकाच महत्त्वाचा असतो. कारण त्यांनी एकूण टक्केवारीत नक्कीच फरक पडत असतो. अभ्यासाची एकच विशिष्ट वेळ ठेवा ज्यावेळी तुमचा मेंदू जास्त सतर्क (alert) असतो. परीक्षेपूर्वी एक तास अभ्यास करण्याचे टाळा. ती वेळ विश्रांतीला द्या आपण केलेला अभ्यास आपले विचार सहजतेने, शांत आपल्याला उत्तरपत्रिकेत मांडता येतील.

२)आरोग्यालाही प्राधान्य दिले गेले पाहिजे.: आरोग्याकडेजराही दुर्लक्ष करू नका. आरोग्यालाही प्राधान्य देणे फार गरजेचे आहे. कारण मन आणि शरीर याचे योग्य संतुलन असेल तरच परीक्षेत तुम्ही उत्कृष्ट कामगिरी बजावू शकता हे ध्यानात असू द्या.६ ते तास झोप ही शरीराला आवश्यक असते. तेव्हा झोपेचा वेळ कमी करून, तो वेळ अभ्यासाला देण्याचा विचारदेखील करू नका. कारण आता तुम्ही जागून अभ्यास कराल,पण त्याचे दुष्परिणाम परीक्षेच्या वेळी भोगावे लागतील. आहारामध्ये फळे, पाले भाज्या, दूध, सुका मेवा यांचा जास्तीत जास्त समावेश करा.
(smitakelkar@globalenable.com)