आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चटकदार लोणची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेरूचे लोणचे
साहित्य- 4 छोटे पिकलेले पेरू, थोडा गूळ,
तेल, मीठ, लाल तिखट, मेथी दाणे व
फोडणीचे साहित्य.
कृती- पेरू स्वच्छ धुऊन चिरून त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. तेल तापवून त्यात अर्धा चमचा मेथी दाणे तळून घ्यावेत. यात मोहरी, हिंग, हळदीची फोडणी द्यावी. आता अर्धा टेबलस्पून लाल तिखट घालून नंतर पेरूच्या फोडी घालाव्यात. वाफ आल्यानंतर थोडेसे गरम पाणी व गूळ घालून चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर शिजवावे.
कैरी-कारल्याचे लोणचे
साहित्य- 1 वाटी कारल्याच्या गोल चकत्या, 1 वाटी कैरीचा कीस, 4 टेबलस्पून लोणचे मसाला, 2 टेबलस्पून तिखट, प्रत्येकी 1 टेबलस्पून हळद, धणेजिरेपूड, मोहरी, तेल, हिंग व मीठ.
कृती- एका भांड्यात कारल्याच्या चकत्या व कैरीचा कीस घेऊन त्यात लोणचे मसाला, तिखट, मीठ, धणेजिरेपूड घालून एकजीव करा. तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करा. ही फोडणी तयार मिश्रणात ओतून व्यवस्थित एकत्र करा. हे लोणचे 2-3 दिवसांनी मुरल्यानंतर खावे.