आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इलेक्ट्रिकल एनर्जीला पर्याय सोलर एनर्जीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्पतरू ट्रस्ट संचालित धन्वंतरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक येथील मेकॅनिकल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाला असलेल्या प्रकल्पासाठी सौर ऊर्जेसंबंधित विषय निवडला. आपल्या देशासमोरील इंधन टंचाईची गहन समस्या लक्षात घेता नैसर्गिक स्रोताचा वापर करीत ऊर्जानिर्मिती कशा रीतीने करता येईल या संकल्पनेवर आधारित असलेला हा प्रकल्प चंद्रकांत काकड, पंकजसिंग आणि श्रावण सोनवणे या विद्यार्थ्यांनी तयार केला असून त्यांना प्रा. अनिल बागूल, प्रा. सुरेश परमवार, प्रा.श्रद्धा देशपांडे, मनोज गुल्हाणे आदींचे मार्गदर्शन लाभले.
या प्रकल्पामध्ये हायड्रॉलिक सिस्टिमद्वारा सोलर पॅनल मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा कशा प्रकारे साठवू शकेल अशी संरचना विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. उपलब्ध सूर्यकिरणांना जास्तीत जास्त कशा रीतीने सोलर पॅनलमध्ये ट्रॅक करता येईल या प्रक्रियेस सोलर ट्रॅकिंग असे म्हणतात. सोलर पॅनल सतत सूर्याकडे दिशा करून फिरत राहिले पाहिजे. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करीत असल्याने सोलर पॅनल सतत सूर्यासमोर स्थिर राहू शकत नाही. ते जर 120 अंशातून फिरवले तर सूर्याच्या उष्णतेचा सतत वापर शक्य होतो. सोलर सेलने बनलेल्या सोलर पॅनलद्वारा सूर्यप्रकाश शोषला जातो. इलेक्ट्रिक संचाला सदर पॅनल जोडले जाते आणि त्यातून विजेची निर्मिती होते. इलेक्ट्रिकल सोलर ट्रॅकिंग सिस्टिम ही इलेक्ट्रिकल सर्व्हो ड्राइव्ह तसेच इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टिमने बनलेली असते. स्टेपर मोटरमुळे सोलर पॅनल 120 अंशातून फिरू शकते. कंट्रोल सिस्टिमद्वारा सर्व्हो ड्राइव्हला इनपूट सिग्नल मिळतो आणि फोटो सेन्सर तसेच इलेक्ट्रॉनिक काउंटर्सद्वारे मोटर चालू होते.
सदर सिस्टिममध्ये ट्रॅकिंग ऑपरेशनसाठी जास्तीत जास्त सोलर एनर्जी वापरली जाते, अन्यथा पर्यायी व्यवस्था म्हणून बॅटरी युनिट वापरता येऊ शकते. हायड्रॉलिक सिस्टिमद्वारा सिस्टिम कार्यरत होत,े ज्यात पॉवर सप्लाय, कंट्रोल सिस्टिम आणि आऊटपूटचा समावेश असतो. हायड्रॉलिक ऑइलच्या वैशिष्ट्यांमुळे पॉवर ट्रान्समिट होते. गतिमान असलेल्या मशीन पार्ट्सला वंगण मिळते. त्यामुळे घर्षण टाळता येते. हायड्रॉलिक रिझव्हॉयर्सचा स्टोरेज टँक तसेच उष्णता परिवर्तनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. सोलर ट्रॅकिंग मेकॅनिझममध्ये लिव्हरचे तत्त्व वापरले जाते. सोलर पॅनल सूर्याच्या दिशेने फिरत राहिल्याने दिवसभरातून जास्तीत जास्त सौर ऊर्जा ग्रहण करता येऊ शकते. फोटो सेलमध्ये साठवलेल्या सौर ऊर्जेचे इलेक्ट्रिकल ऊर्जेमध्ये रूपांतर होऊन त्यावर सीएफएल बल्ब प्रकाशमान होऊ शकतात किंवा त्यावर इलेक्ट्रिक उपकरणदेखील चालू शकते.
सौर ऊर्जेचा या प्रकल्पामध्ये अधिकाधिक प्रमाणात वापर केला आहे. सोलर पॅनलचे आकारमान आटोपशीर असल्याने ते सहजरीत्या बसवता येणे शक्य होते आणि सोलर पॅनलचा समावेश असलेल्या या मेकॅनिकल ट्रेकिंग सिस्टिममुळे चॅनलची उत्पादन क्षमता तसेच उपयुक्तता वाढवण्यास मदत झाली आहे. इलेक्ट्रिकल एनर्जीची वाढती मागणी पाहता त्यावर पर्याय म्हणून या उपकरणाचा वापर प्रभावशाली आहे असे लक्षात येते.
कार्बन केटी -21 साडेचार हजारांत
कार्बन आणणार स्वस्त टॅब्लेट
सोलर इलेक्ट्रिक मोटार, चार्ज करा चाळीस किलोमीटर चालवा