आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फराळ दिवाळीचा : पारंपरिक रेसिपींना द्या नवा टच, दिवाळीसाठी काही खास पाककृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थंडी पडली नसली अजून तरी दिवाळी पुढच्या आठवड्यावर येऊन ठेपलीय, असं कॅलेंडर सांगतंय. एक आठवडा खूप झाला ना फराळाचं ठरवायला? म्हणजे कोणते पदार्थ करायचे, कधी, किती वगैरे वगैरे. तर हेच ठरवण्यात आमची थोडीशी मदत या अंकात. फराळाच्या नेहमीच्या पदार्थांना दिलेला एक ट्विस्ट. करायला सोपे अन तरीही चविष्ट.
आपणा सर्वांची दिवाळी रुचकर व्हावी म्हणून मधुरिमाचा हा पाककृतींनी सजलेला खमंग विशेषांक.

नितीशा स्मार्त-औरंगाबाद, ज्योती मोघे-भोपाळ, डॉ. अंजली राजवाडे-अकोला, वैशाली देशमुख-अमरावती, मीनाक्षी वाणी-जळगाव यांनी पाठवलेल्या काही खास रेसिपींमधून यंदाचा तुमचा दिवाळीचा फराळ आणखी खास बनवणार आहोत.
बेसन मावा बर्फी
साहित्य : दीड वाटी बेसन, अर्धी वाटी साजूक तूप, शंभर ग्रॅम खवा किंवा मावा, एक वाटी पिठीसाखर, वेलची पूड, कलिंगडाच्या बिया २ चमचे, बदाम, काजू आणि पिस्त्याचे बारीक तुकडे.
कृती : कढईत कलिंगडाच्या बिया थोड्या भाजून बाजूला काढून ठेवाव्यात. मग कढईत तूप घालावे. तूप गरम झाले की, त्यात बेसन घालून छान खरपूस भाजावे. दुसऱ्या कढईत खवा चांगला परतून बाजूला काढून ठेवावा. बेसन दुसऱ्या भांड्यात काढून थंड करावे. त्याच कढईत थंड केले तर जळायची शक्यता जास्त. थोडे थंड झाल्यावर त्यात खवा घालून तो चांगला मळून घ्यावा. नंतर वेलची पूड, एक वाटी साखर, कलिंगडाच्या बिया आणि सुक्या मेव्याचे तुकडे घालून चांगले हलवून घट्ट गोळा तयार करावा. एका ताटलीला तूप लावून त्यात हा गोळा ओतावा. चांगला थापून घ्यावा. थोड्या वेळाने त्याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात. बेसन मावा बर्फी तयार.
पुढील स्लाइड्सवर पाहू, अशाच काही एकापेक्षा एक सरस अशा रेसिपीज..
बातम्या आणखी आहेत...