आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इको फ्रेंडली अन् स्वस्त पर्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आताशा उत्तम आरोग्यभान येऊन मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकीन वापरणाऱ्या महिलांसाठी हा लेख.
— आनंदी पॅड्स-आकार इनोव्हेशन्स
ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देत ही संस्था पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन तयार करते. बाजारातील नॅपकिन्सच्या तुलनेत ४० टक्के कमी भावात म्हणजेच २ रुपये प्रति पॅड या भावाने हे मिळतात. हे पॅड्स शंभर टक्के विघटनशील घटकांपासून बनवलेले असून ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्यासह रोजगारनिर्मितीचे साधन बनत आहेत.
संपर्क : www.aakarinnovations.com
— आझादी
शंभर टक्के पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन तयार करणा-या या संस्थेचा १३ हजार लघु उद्योजक महिलांमार्फत ४ दशलक्ष महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. बाजारातील नॅपकिन्सच्या तुलनेत हे नॅपकिन्स ४३ टक्के कमी किंमतीत उपलब्ध आहेत. आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकतो.
संपर्क : azadi.co.in
—इको फेमे
प्लास्टिकचा वापर असलेल्या किंवा ‘यूज अँड थ्रो’ नॅपकिनमुळे होणारे प्रदूषण पूर्णपणे टाळण्यासाठी तामिळनाडूतील AVAG या संस्थेने ग्रामीण महिलांना हाताशी धरत, त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागृती करत वॉशेबल नॅपकिन्स तयार केले आहेत. हे नॅपकिन्स द्रवपदार्थ शोषून घेण्याची विशेष क्षमता असणा-या सुती कपड्यापासून बनवलेले आणि धुण्यास अत्यंत सोपे असतात. स्वच्छ पाण्यात अर्धा तास भिजवून, धुऊन, प्रखर सूर्यप्रकाशात वाळवल्यास नॅपकिन्समुळे आरोग्यासही धोका उद्भवत नाही. अविघटनशील कच-याच्या समस्येमुळे भविष्यात बहुतांश कंपन्यांना असे वॉशेबल नॅपकिन्स तयार करावे लागणार आहेत.
संपर्क : ecofemme.org/
— शीकप्स
भारतीय महिलांसाठी मेन्स्ट्रुअल कप्स हा अत्यंत नवीन प्रकार आहे. वैज्ञानिकांच्या मते, सॅनिटरी नॅपकिन्सच्या तुलनेत हा पर्याय अधिक स्वच्छ, आरोग्यास पोषक आहे. यात जमा होणा-या रक्ताची दुर्गंधी येत नाही, तसेच त्वचा विकार होत नाहीत.
कप्स खरेदीसाठी : http://shycart.com/prd-menstrual-cup-shecup-793
— जयश्री इंडस्ट्रीज
‘मेन्स्ट्रुअल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अरुणाचलम मुरुगनाथम यांनी अत्यंत स्वस्तातील सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याचे यंत्र विकसित केले आहे. वीज वा पॅडलवर चालणा-या यंत्रातून दिवसाला हजार नॅपकिन्स तयार होतात. ८ पॅक्समागे १६ रुपये खर्च येतो. ही संस्था ग्रामीण भागातील महिलांना ८० हजार रुपये किंमतीचे हे यंत्र पुरवण्यास प्रोत्साहन देते.
संपर्क: muruganantham_in@yahoo.com
गूंज - नॉट जस्ट अ पीस ऑफ क्लॉथ
संस्थेद्वारे स्वच्छ सुती कपड्यांच्या लहान-लहान तुकड्यांपासून पॅड तयार केले जातात. ‘माय पॅड’ म्हणून ओळखल्या जाणा-या प्रॉडक्टमार्फत ही संस्था ग्रामीण महिलांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षात संस्थेने अडीच दशलक्षहून अधिक पुनर्वापर होणारे इकोफ्रेंडली नॅपकिन तयार केले आहेत.
संपर्क: http://njpc.goonj.org/#
— जीविका पॅड्स
खादी कपड्यापासून तयार केलेल्या या इको फ्रेंडली पॅडचा सेट फक्त ५० रुपयांत उपलब्ध आहे. aidsite@gmail.com या ईमेलवर पॅड्सची ऑर्डर देता येते.
— घरच्या घरी पॅड बनवा
पर्यावरण संरक्षणाची खरी तळमळ असणा-या स्वावलंबी महिलांना घरच्या घरी कपड्याचे पॅड तयार करता येतील. यासंबंधीच्या टिप्स : http://www.wikihow.com/Make-Your-Own-Reusable-Menstrual-Pads