Home | Magazine | Kimaya | sony ericsson new expira model

सोनीचा नवा एक्सपिरिया

दिव्य मराठी | Update - Jul 27, 2012, 10:44 PM IST

सोनीने या वर्षाच्या सुरुवातीला नव्या फोनची एक्सपिरिया निओची घोषणा केली होती

  • sony ericsson new expira model

    सोनीने या वर्षाच्या सुरुवातीला नव्या फोनची एक्सपिरिया निओची घोषणा केली होती. हा फोन काही दिवसांपूर्वी भारतात दाखवण्यात आला. कंपनीने या अँड्रॉइड फोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही, पण ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर इन्फिबिम वर एक्सपिरिया निओची किंमत 18,599 रुपये दाखवलेली आहे.
    हा मोबाइल 7 ऑगस्टपर्यंत ग्राहकांना मिळू शकेल. निओ सोनीकडून पहिला आयसीएस बेस्ड स्मार्टफोन आहे. 4 इंचांची एफडब्ल्यूव्हीजीए टीएफटी कॅपसिटिव्ह स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये सोनी प्लेस्टेशनचे गेम सर्टिफाइड केलेले आहेत. इतर वैशिष्ट्ये : प्रोसेसर 1 गीगाहटर््झ आणि रॅम 512 एमबी आणि निओ एल इंटरनल मेमरी 1 जीबी आहे. मेमरी कार्डाद्वारे 32 जीबीपर्यंत ती वाढवता येते. कॅमेरा : 5 मेगा पिक्सल, ऑटो फोकस, थ्रीजी आणि वायफायची सोय.

Trending