सोनीच्या नव्या एलसीडी / सोनीच्या नव्या एलसीडी टीव्हीचा धमाका

दिव्‍य मराठी

Apr 06,2012 10:48:32 PM IST

जपानच्या सोनी कंपनीबाबत काय सांगावे... याचे टीव्ही दिसण्यात आणि चालण्यात उत्कृष्टच असतात. यांच्या ब्राविया सिरीजचे टीव्ही सेट्स बाजारात जबरदस्त आघाडीवर आहेत; पण इथे आम्ही आपणास त्यांच्या वेगळ्या टीव्हीबाबत माहिती देत आहोत.
या शृंखलेत कंपनीचा नवा सेट केएलव्ही 32 ईएक्स 310 बाजारात आला आहे. नवा असल्याच्या कारणामुळे इतका प्रसिद्धी पावलेला नसला तरी आपल्या चांगल्या दर्जामुळे बाजारात निश्चितच आघाडीवर राहील. याची ब्लॅक बॉडी वेगळाच लूक दर्शवते. कॉन्ट्रस्ट पिक्चरबाबतीत तर हा टीव्ही कमालीचा चांगला आहे. या टीव्हीत रंगसंगती खुलून दिसते. तसेच वाढीव आवाजापासून बचावण्यासाठी तो फिल्टर करून येण्याची सुविधा आहे. या टीव्हीच्या वापरामुळे विजेची बचत होते. याची लांबी 48 सेंमी, तर रुंदी 76 सेंमी इतकी आहे. या टीव्हीची किंमत 33 हजार 500 रुपये इतकी आहे.

X
COMMENT