आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर : आवाज की दुनिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साउंड इंजिनिअर किंवा ऑडिओ इंजिनिअर होण्यासाठीची पात्रता किमान बारावी सायन्स उत्तीर्ण अशी आहे. इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्ससारख्या विषयांची आवड असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे चांगले क्षेत्र आहे.
कोणत्याही सामाजिक कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे आवाज! सांस्कृतिक, सांगीतिक असा कुठलाही कार्यक्रम कितीही गुणी, उत्तम कलाकार सादर करणारे असले तरी ध्वनियंत्रणा जर सदोष असेल तर रांगेतल्या शेवटी बसलेल्या लोकांपर्यंत तो कार्यक्रम यशस्वीरीत्या पोहोचू शकत नाही आणि पर्यायाने संपूर्ण कार्यक्रम फ्लॉप शो होऊ शकतो म्हणूनच तर साउंड इंजिनिअर्स हे फार महत्त्वाचे ठरतात. साउंड इंजिनिअरिंग किंवा ध्वनी अभियांत्रिकी हे क्षेत्रच मुळात कल्पक आणि शास्त्रोक्त आहे. ध्वनींचे प्रकार ते संपूर्ण ध्वनियंत्रणा अशा व्यापक विषयांचे शास्त्रीय शिक्षण-प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते. अकाउस्टिक्स किंवा ध्वनी संदर्भातील शास्त्र किंवा भाष्य हा अशा कोर्सचा मुख्य भाग असू शकतो. इलेक्ट्रोअकाउस्टिक्स अर्थात ध्वनी संयोजनातील विजेचा वापर आणि महत्त्व किंवा सायको अकाउस्टिक्स म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करून केले जाणारे संयोजन अशा कितीतरी विविध पातळ्यांवरील शिक्षण, प्रशिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळू शकते. रेकॉर्डिंग स्टुडिओ किंवा ध्वनिमुद्रण स्टुडिओमधील ध्वनिमुद्रण त्यातील बारकावे, नवनवीन संशोधन, अधिकाधिक स्पष्ट्र आणि स्वच्छ आणि निर्दोष ध्वनिनिर्मिती त्या अनुषंगाने येणारे तंत्रज्ञान, विविध विजेच्या उपकरणांचा वापर अशा अनेक क्लिष्ट्र वाटणार्‍या गोष्ट्रींची जबाबदारी साउंड इंजिनिअर्सवर असते. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण किंवा लाइव्ह रेकॉर्डिंग करताना कोणत्या गोष्ट्रींची काळजी घ्यावी, कुठले दोष टाळावेत या गोष्ट्री सुद्धा शिकावयास मिळतात. डॉल्बी किंवा डिजिटल साउंडचा वापर कुठे व कसा होतो, त्यासाठी सिग्नलिंगची व्यवस्था कशी असावी. मायक्रोफोन्स, साउंड सिस्टिम, केबल कनेक्टर्ससारख्या वस्तूंचा नेमका वापर, त्यांची माहिती देण्याचा इथे प्रयत्न असतो. बंदिस्त सभागृहातील ध्वनी संयोजनाची मागणी निराळी असते, मोकळ्या पटांगणावरील कार्यक्रमांसाठी आणखी वेगळीच सिस्टिम असते तर भल्या मोठ्या स्टेडियममधील कार्यक्रमांसाठी काहीतरी वेगळीच! अमिताभ बच्चनचे तेरे जैसा यार कहा.... कहा ऐसा याराना सारखे स्टेडियममधील गाणे आठवून पाहा. साउंड इंजिनिअर किंवा ऑडिओ इंजिनिअर होण्यासाठीची पात्रता किमान बारावी सायन्स उत्तीर्ण अशी आहे. इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्ससारख्या विषयांची आवड असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे चांगले क्षेत्र आहे. पात्रतेचे निकष हे बहुतेक कॉलेज किंवा संस्थेवर बदलणारे असतात. तुलनेने खर्चिक असे हे कोर्स आहेत, पण इथे पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल्सही असतात शिवाय प्रोजेक्ट वर्क असतात आणि संपूर्ण सुसज्ज अशा प्रोफेशनल स्टुडिओमध्ये कामाचा अनुभवही मिळतो. नवी दिल्ली येथील श्री अरविंदो सेंटर फॉर आटर््स अँड कम्युनिकेशनमध्ये साउंड इंजिनिअरचे कोर्सेस उपलब्ध आहेत. एक वर्षाचे तसेच सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा आहेत.info@sac.ac.in या ई-मेलवर मेल केल्यास माहिती मिळू शकेल तसेच साउंड इंजिनिअरिंग अकॅडमीचे देखील कोर्सेस उपलब्ध आहेत. साउंड इंजिनिअरिंग अकॅडमी ही इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नूबरोबर हे कोर्सेस चालवते. पुणे, महाराष्ट्रÑ, येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे बारावीनंतर तीन वर्षांचा बॅचलर्स कोर्स करता येऊ शकतो. मात्र इथे प्रवेश अत्यंत मर्यादित असतात. त्यामुळे आधी प्रवेश परीक्षा, मुलाखतीनंतरच प्रवेश निश्चित होऊ शकतो. अशा नामांकित संस्थांमधून केलेल्या कोर्सचा फायदा चांगलं प्लेसमेंट मिळवण्यासाठी निश्चित होतो.
साउंड किंवा ध्वनी अभियांत्रिकी हे क्षेत्रच मुळात कल्पक
साउंड इंजिनिअरिंग किंवा ध्वनी अभियांत्रिकी हे क्षेत्रच मुळात कल्पक आणि शास्त्रोक्त आहे. ध्वनींचे प्रकार ते संपूर्ण ध्वनियंत्रणा अशा व्यापक विषयांचे शास्त्रीय शिक्षण- प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते. अकाउस्टिक्स किंवा ध्वनी संदर्भातील शास्त्र किंवा भाष्य हा अशा कोर्सचा मुख्य भाग असू शकतो. इलेक्ट्रोअकाउस्टिक्स अर्थात ध्वनी संयोजनातील विजेचा वापर आणि महत्त्व किंवा सायको अकाउस्टिक्स म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करून केले जाणारे संयोजन अशा कितीतरी विविध पातळ्यांवरील शिक्षण, प्रशिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळू शकते.