आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Recipes By Jyoti Moghe On Occasion Of Diwali

डिंक गुजिया, रबडी आणि मावा जिलेबी, वाचा काही खास डेझर्टच्या Recipes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला पैकीच्या पैकी गुण मिळाले
ज्योती मोघे, भोपाळ

आज कुठलाही पदार्थ पहिल्यांदा करून पाहते तेव्हा मला लग्नानंतरचा तो प्रसंग हमखास आठवतो. नवीन लग्न झालेल्या सुनेनं घरात केलेला पहिला पदार्थ हा प्रत्येक घरातच कुतुहलाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. माझं लग्न झाल्यानंतर मलाही काहीतरी बनवण्यास सासरच्या मंडळींनी सांगितलं. मला खरं तर खूप ताण आला होता. कारण घरात सासू, सासरे, दीर-जाऊ, नणंद हे सगळे असताना आपण केलेला पदार्थ बिघडला तर अशी भीती सारखी वाटत होती. त्यातून सासऱ्यांनी विचारलं की, सूनबाई रवा, मैदा, साखर, तूप आणि केशरी रंग यांच्या मदतीनं तुम्हाला काही बनवता येईल का? सासऱ्यांनी विचारलेल्या या प्रश्नानं मी गांगरून गेले. मात्र त्याचवेळी बोलून गेले की, हो मामंजी बनवता येईल. सासऱ्यांना तर हो बोलून गेले होते पण काय तयार करायचे ते कळत नव्हते. तसं तर गोड पदार्थ खूप शिकवले होते आईनं पण एवढ्याच सामग्रीवर काय तयार करायचं हा प्रश्न पडला. शेवटी मी त्याचे केशरी चिरोटे तयार केले. नंतर जेवताना सगळ्यांना वाढले. त्यावेळी कुणी काहीच बोललं नाही. जेवण झाल्यानंतर सासऱ्यांनी सगळ्यांच्या हातात कागदाचा एक तुकडा देऊन त्यावर मी केलेल्या पदार्थासाठी द्यावयाचे गुण लिहायला सांगितले. शेवटी सगळ्यांना दिलेले तुकडे एकत्र करून त्यांनी सांगितले की, मला त्यांनी घेतलेल्या परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहेत म्हणून. आजही कुठल्याही सणाला जेव्हा सासरी सगळी मंडळी एकत्र जमतात तेव्हा या प्रसंगाची हमखास आठवण काढली जाते. वर दिलेले सर्व पदार्थ माझ्या घरच्यांचे आवडते आहेत.
खुसखुशीत चकल्यांसाठी
- चकली करताना छोट्या झाऱ्यावर पाडावी. आणि मग झारा तेलात सोडून द्यावा. एकसारख्या आकाराच्या चकल्या होतात.
- तेल चांगले तापवून मग मंद आचेवर चकल्या तळाव्यात.
- प्रखर आचेवर चकल्या तळू नयेत. त्या लवकर तळल्या जाऊन थंड झाल्यावर चकल्या मऊ पडतात.
- पिठात तेलाचे मोहन जास्त झाले तर चकल्या तेलात तळतानाच विरघळतात.
- पीठ भिजवताना हळद घालू नये. चकली तळल्यावर काळी दिसते.
jyotimoghe@yahoo.in
पुढील स्लाइड्सवर वाचा, ज्योती मोघे यांची स्पेशालिटी असलेल्या काही खास Recipes...