आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Scholarship For SC Students Of M.phil P.hd

परीक्षा: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एमफिल/पीएचडी करण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एमफिल व पीएचडी करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे देण्यात येणा-या विशेष शिष्यवृत्तींसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
* उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या 25 असून, या शिष्यवृत्ती पात्रताधारक विद्यार्थ्यांना ह्युमॅनिटीज, सामाजिक विज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व अभियांत्रिकी यासारख्या विषयांतर्गत भारतीय विद्यापीठ वा संशोधन संस्थांमध्ये एमफिल वा पीएचडी करण्यासाठी देण्यात येणार आहेत.
ल्ल विशेष सूचना : उपलब्ध शिष्यवृत्तींपैकी 30% शिष्यवृत्ती महिला विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
* आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे निवासी असावेत ते अनुसूचित जातींमधील असायला हवेत. त्यांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संशोधनपर शिष्यवृत्ती योजनेशिवाय एमफिल/ पीएचडी करण्याची तयारी असायला हवी.
योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची निवड झाल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या संबंधित विषयातील संशोधनपर कामासाठी निर्देशित विद्यापीठ वा संशोधन संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे.
* निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची निवड त्यांची पात्रता व गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.
* उपलब्ध शिष्यवृत्तीचा तपशील : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल ज्युनिअर फेलोशिप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल सिनियर फेलोशिप देण्यात येऊन त्यानुसार शिष्यवृत्ती देण्यात येईल.
* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या 8 ते 14 जून 2013च्या अंकात प्रकाशित झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणेची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिट्यूट http://barti.maharashtra.giv.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि प्रस्तावित संशोधन विषयाच्या आलेखासह असणारे अर्ज डायरेक्ट जनरल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, 28, क्विन्स गार्डन, कॅम्प, पुणे 411001 या पत्त्यावर 31 ऑगस्ट 2013 पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना शिष्यवृत्तीसह संशोधनपर एमफिल वा पीएचडी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकेल.


पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि संधी
पर्यावरणाचा वाढता ºहास व त्यामुळे निर्माण होणारे भौगोलिक, नैसर्गिक असंतुलन यावर तोडगा व कायमस्वरूपी उपाय म्हणून पर्यावरण विज्ञान या विषयाचे महत्त्व आणि माहात्म्य पूर्वी कधी नव्हते एवढे वाढले आहे. यासाठी पर्यावरणशास्त्र वा पर्यावरण विज्ञान हे नवे शैक्षणिक क्षेत्र विकसित झाले असून, आज त्याला एक प्रगत शैक्षणिक क्षेत्र असे स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठ वा संशोधन संस्थांमध्ये आता पर्यावरण विज्ञान या विषयावरील शिक्षण- प्रशिक्षण- संशोधनाची सोय उपलब्ध असून या कामी सरकार- शासनाचे पण प्रोत्साहन लाभत आहे.
शैक्षणिक संदर्भात सांगायचे झाल्यास पर्यावरणशास्त्र वा पर्यावरण विज्ञान विषयातील पात्रताधारक उमेदवारांना प्रामुख्याने ज्या रोजगार संधी उपलब्ध होतात त्या पुढीलप्रमाणे-
’ पर्यावरणशास्त्रज्ञ : विविध प्रकल्प आणि उद्योग-प्रक्रियांचा मानव आणि मानवी व्यवहारांवर होणाºया पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करून त्यानुसार कारवाई करणे व पर्यावरणावर होणाºया विपरीत परिणामांच्या संदर्भात ठोस उपाययोजना सादर करून त्यांची अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे.
’ पर्यावरण अभियंता : पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात तांत्रिक मुद्दे आणि कारवायांचा अभ्यासक्रम उपाययोजना सुचविणे. त्याचप्रमाणे विविध क्रियांद्वारा निर्माण होणाºया सांडपाणी व इतर निरुपयोगी वस्तूंवर आवश्यक ती प्रक्रिया करून त्यांची विल्हेवाट लावणे.
’ पर्यावरणविषयक समन्वयक : पर्यावरणाशी संबंधित विविध व्यक्ती, संस्था, शासन, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था व महामंडळे इ.शी समन्वय साधणे.
’ पर्यावरण अभ्यासक्रम : पर्यावरणविषयक विविध विषय, पैलूंचा अभ्यास करून त्यानुसार संशोधन वा शिक्षण विषयक काम करणे इ.
ल्ल शैक्षणिक अभ्यासक्रम : स्तर आणि तपशील : पर्यावरण विज्ञान वा पर्यावरणशास्त्र या विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, अभ्यासक्रम उपलब्ध असून, काही संशोधन संस्थांमध्ये याच विषयातील संशोधनपर पीएचडी करण्याची सोय उपलब्ध असते. या शैक्षणिक अभ्यासक्रमांचा उपयोग याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
पर्यावरणशास्त्र व पर्यावरण विज्ञान विषयातील करिअर करायचे झाल्यास संबंधितांनी प्रत्येक बाबीचा सखोल व तपशिलवार विचार आणि अभ्यास करणे फार गरजेचे असते. त्यालाच जोड आवश्यक असते ती सातत्य, एकाग्रता, वेळेत निर्णय घेण्याची क्षमता याची. संबंधित विषयाचे तपशीलवार ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती, नेटके लिखाण व संभाषणप्राविण्य असणे अर्थातच उपयोगी ठरते.
या क्षेत्राशी संबंधित काही आव्हाने आजही प्रचलित आहेत. या आव्हानांमध्ये प्रामुख्याने ज्या आव्हानपर मुद्दे वा पैलू असतात ते म्हणजे या विषयांमध्ये अद्यापही पुरेसे व नव्या स्वरूपातील संशोधन झालेले नाही. याशिवाय सर्वसामान्यच नव्हे तर संबंधितांनासुद्धा पर्यावरणविषयक प्रयत्न आणि त्याचे महत्त्व आणि माहात्म्य याची पुरती जाण नसते. ही जाण निर्माण करण्याचे कामसुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरते.
पर्यावरण विज्ञान वा पर्यावरणशास्त्र या विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ज्या
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्र वा पर्यावरण विज्ञान विषयातील पदवी घेऊन वा याच विषयांमधील
पदवीधारांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह पर्यावरणशास्त्र वा संबंधित विषयात पुढील करिअर करायचे असल्यास त्याच्यासाठी वरील अभ्यासक्रम फायदेशीर ठरू शकतात.