आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Scholarship Scheme Handicap Student,. Divya Education

अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयातर्फे अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्नी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणार्‍या अपंग विद्यार्थी विशेष शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक अपंग विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

> आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी त्यांच्या संबंधित पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र असावेत. त्यांनी अशा अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांहून अधिक नसावे.

> शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत देण्यात येणार्‍या एकूण शिष्यवृत्तींची संख्या 1500 असून त्यापैकी 30% शिष्यवृत्ती या महिला अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात.
> शिष्यवृत्तींची रक्कम व इतर फायदे : योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे शिष्यवृत्ती व इतर अनुषंगिक फायदे उपलब्ध होतील.

>व्यावसायिक क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी दरमहा 2500 रु. तर पदव्युत्तर

>अभ्यासक्रमासाठी दरमहा 300 रु.ची शैक्षणिक शिष्यवृत्ती.
पुस्तक, शैक्षणिक साहित्य वा इतर अनुषंगिक खर्चापोटी पदवी अभ्यासक्रमासाठी वार्षिक 6000 रु. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वार्षिक 10000 रु.चे अर्थसाहाय्य.
याशिवाय पात्रताधारक विद्यार्थी अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असल्यास अशा शैक्षणिक संस्थांना पण विशेष अर्थसाहाय्य देण्यात येईल.

> अधिक माहिती व तपशील : या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 8 ते 14 मार्च 2014 च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाची जाहिरात पाहावी, मंत्रालयाच्या दूरध्वनी क्र. 0129-2226910 वर संपर्क साधावा किंवा www.socialjustice.nic.in अथवा www.uhfdc.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

> अर्ज करण्याची पद्धत : संगणकीय पात्रताधारक उमेदवार, त्यांचे पालक अथवा संस्थांनी संगणकीय पद्धतीने www.nhfdc.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करून त्याची प्रत संबंधित शैक्षणिक संस्था प्रमुखामार्फत नॅशनल हँडिकॅण्ड फायनांस अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेडक्रॉस भवन, सेक्टर-12, फरिदाबाद- 121007 (हरियाणा) या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
विशेष सूचना : या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची विशिष्ट अशी अंतिम तारीख नसल्याने त्यासाठी वर्षातून केव्हाही अर्ज करता येतो हे विशेष.