आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पिलबर्गचा ‘नेपोलियन’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टॅनले क्युबरिक याच्या चित्रपटांनी एकेकाळी जगभर खळबळ माजवली होती. आजही क्युबरिक यांच्या चित्रपटाचे जगभर चाहते आहेत. त्यामध्ये हॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि निर्मातेही आहेत. नुकतेच दोन ऑस्कर पुरस्कार पटकावलेल्या ‘लिंकन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी ‘नेपोलियन’ या फ्रेंच सम्राटावर एक लघुमालिका तयार करणार असल्याची घोषणा केली आहे. या लघुमालिकेसाठी ते स्टॅनले क्युबरिक यांनी नेपोलियनवर तयार केलेली पटकथा वापरणार आहेत. 1960च्या दशकात नेपोलियनच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यासाठी स्टॅनले क्युबरिक यांनी स्वत: पटकथा लिहिली होती. त्यासाठी त्यांनी प्रचंड संशोधन केले होते. त्यानंतर 1971मध्ये ते या पटकथेवर चित्रपट निर्मिती करणार होते.

बाँडपटासाठी मेंडिसचा ‘नो’
‘स्कायफॉल’ या बाँडपटानंतर पुन्हा बाँडपट दिग्दर्शित करण्यास सॅम मेंडिसने नकार दिला आहे. सॅम मेंडिसने ‘स्कायफॉल’मध्ये बाँडमधील मानवीपण लोकांपुढे आणले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कामगिरीही केली होती. एकट्या ब्रिटनमध्ये या चित्रपटाने 10 कोटी युरोंचा धंदा करून ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून विक्रम केला होता. या पार्श्वभूमीवर मेंडिसने पुढचा बाँडपट करावा अशी निर्मात्यांची इच्छा होती, पण मेंडिसने नकार देऊन सर्वांनाच बुचकळ्यात पाडले. ‘स्कायफॉल’ करताना शारीरिक आणि मानसिक पातळीवर प्रचंड थकवा आला होता आणि या चित्रपटासाठी जे करायचे होते तेवढे मी केले, आता नव्या प्रॉडक्शनकडे वळणार असल्याचे मेंडिस यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.