आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी निवड आयोगाची पदवीधर निवड परीक्षा-2013

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध विभागात पदवीधर उमेदवारांची निवड करणासाठी घेण्यात येणा-या पदवीधर निवड परीक्षा-2013 साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हवेत.
* वयोमर्यादा : 27 वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
* निवड प्रक्रिया : अर्जदारापैकी पात्रताधारक उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर निर्धारित परीक्षा केंद्रांवर 14 व 21 एप्रिल 2013 रोजी घेण्यात येईल. या निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणा-या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
* वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या सेवेत त्यांना दरमहा 9300-34800+4600 या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदे पण देय असतील.
* अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून उमेदवारांनी 100 रु. भरणे आवश्यक आहे.
* अधिक माहिती व तपशील : अर्जाचा नमूना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 19 ते 25 जानेवारी 2013च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी. अथवा
आयोगाच्या http://ssconline2.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
* अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2013.