आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालेर पायेश, कडा परशाद अन् पौष्टीक मनगणे, वाचा काही खास Recipes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्याची स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे. त्या त्या भागामध्ये काही खास अशा रेसिपी असतात. त्यावरून त्या भागांना ओळखही मिळत असते. अशाच काही विविध भागांतील रेसिपी आणि त्याबरोबर गृहिणींच्या आठवणी खास दिवाळीच्या निमित्ताने घेऊन आलो आहोत.
स्वयंपाक शिकले लग्नानंतर
ओमना नायर, मुंबई
मी लहान होते तेव्हा कुटुंबं मोठी असत, आणि साधनं कमी. जे काही सहज व स्वस्त उपलब्ध असेल त्यातूनच घरात स्वयंपाक केला जाई. पायसम, आमचं आवडतं पक्वान्न, आमच्या वाढदिवसाला व सणांना होत असे. पण मला अधिक आवडायचं तसं पाल पायसम किंवा दुधाचं पायसम फार क्वचित होई, कारण दूध उपलब्ध नसायचं. आम्ही होतो केरळात, त्यामुळे नारळ भरपूर असायचे घरी. मूग डाळ आणि गूळ हेही पदार्थ स्वस्त व सहज मिळत. मला हे पायसम लहान असताना कधीच आवडायचं नाही. पण आई माझ्या वाढदिवसाला नेहमी खूप प्रेमाने ते करायची. मोठी हाेत होते, तेव्हा मी स्वयंपाक करायला शिकलेच नाही. माझ्या आईने मला अभ्यास आणि करिअरवर भर दे, असंच नेहमी बजावलं. स्वयंपाक मी कधीही शिकू शकते, असं ती म्हणायची. लग्नानंतर मी सासू, आई आणि इतर ओळखीच्या स्त्रियांकडून स्वयंपाक करायला शिकले. आता हे पायसम मला खूप आवडतं आणि माझ्या मुलांनाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही चविष्ट पदार्थांची रेसिपी आणि त्याबाबतच्या आठवणी...
बातम्या आणखी आहेत...