आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉट कॉम : खाद्यसंस्कृती टिकवणाऱ्या वेबसाईट्स आणि ब्लॉग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजघडीला अवघे जग हे मोबाईलच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागले आहे. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने खाद्यसंस्कृती टिकवण्यासही हातभार लावला जातो. विविध भागांमध्ये तेथील ओळख बनलेल्या रेसिपी इंटरनेटच्या माध्यमातून घरोघरी पोहोचल्या आहे. त्यामुळे खाद्य पदार्धांनी राज्यांची सीमा केव्हाच ओलांडली आहे. अशाच काही वेबसाईट्स आणि ब्लॉग्सबाबत या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

मिसळपाव
www.misalpav.com

खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट. मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती असं घोषवाक्य असणारी ही साइट खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या साइटवर सदस्य झालेली अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींचे खाद्यपदार्थांशी निगडित अनुभव, आठवणी, एखाद्या पदार्थाचा फसलेला अनुभव, झकास जमलेल्या एखाद्या पदार्थाच्या रेसिपीचं रहस्य, इतरांनाही तो पदार्थ करता यावा यासाठीच्या टिप्स, पर्यटन स्थळाला भेट दिलेल्यांनी तिथली खासियत असलेल्या डिशबद्दल सांगितलेली माहिती, अशा अनेक अंगांनी ही वेबसाइट रंगतदार झाली आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीनं या साइटवरचं लेखन असल्यामुळं, रेसिपी या प्रकारात तुम्हाला रुची नसली तरी कधीतरी विरंगुळा म्हणूनही या साइटला भेट द्यायला हरकत नाही. कारण खाद्यसंस्कृतीच्या शेअरिंगबरोबरच, साहित्य, चर्चा, काव्य, तंत्रजगत, भटकंती, इत्यादी विविधांगी सदरं असल्यामुळेही ही साइट रंजक आहे. खास दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेला रुची विशेषांक तर विशेष वाचनीय असाच आहे.
--------------------------------
मराठी खाद्यसंस्कृती
www.marathimati.com

मराठी शाकाहारी-मांसाहारी पदार्थ आणि त्यांची रेसिपी तर बहुतांश फूड ब्लॉग आणि वेबसाइटवर असतेच. पण त्यातही आपलं वेगळेपण जपणाऱ्या वेबसाइट आहेत. मराठी खाद्यसंस्कृती ही त्यातलीच एक. नावाप्रमाणेच आपलं वेगळेपण जपणारी. वेगळेपण अशा अर्थाने की या साइटवर केवळ पदार्थ, त्याची कृती इतक्याच माहितीचा समावेश नाही तर आहारासोबतच आरोग्याचं महत्त्वही वाचकांना समजावून सांगण्याचा एक चांगला प्रयत्न या साइटवर केला गेलाय. अन्न तयार करताना घ्यायची काळजी, अन्न ग्रहण करताना पाळावयाचे किमान मॅनर्स, यासंबंधीचं मार्गदर्शन आहे. शिवाय अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे पटवून सांगणारे अनेक चांगले, समाजाला मार्गदर्शनपर विचारही या साइटवर वाचायला मिळतात. आहार, आहाराचे नियोजन, स्वच्छता, व्यायामाचे महत्त्व, आरोग्य मापक, पदार्थांचं वर्गीकरण आणि या विषयाशी संबंधित प्रश्नोत्तरं असं स्वरूप असणारी ही साइट आवर्जून दखल घ्यावी अशीच आहे.
--------------------------------
व्हेज रेसिपीज इन इंडिया
www.vegrecipesofindia.com/recipes/maharashtrian-cuisine

खास शाकाहारी खवय्यांसाठीची वेबसाइट म्हणजे व्हेज रेसिपीज इन इंडिया. या साइटवर महाराष्ट्रातल्या केवळ शाकाहारी पदार्थांचीच माहिती देण्यात आली आहे. मराठी भाषेशी फारसा संबंध नसलेल्या परंतु मराठी खाद्यपदार्थांच्या प्रेमात पडलेल्यांसाठी ही साइट खूप उपयुक्त आहे. कारण या साइटवर देण्यात आलेली संपूर्ण माहिती इंग्रजीमधून देण्यात आली आहे. दक्षिण आणि उत्तर भारतीय पदार्थ, रस्त्यांवर मिळणारे फास्ट फूड, लसणाच्या वापराशिवाय बनवता येणारे पदार्थ, लो फॅट रेसिपीज, तसंच भात आणि वरणाचे विविध प्रकार, नाश्ता, पक्वान्नं, आणि लहानमुलांच्या पसंतीस उतरतील अशा पदार्थांच्या रेसिपीज साइटवर देण्यात आल्या आहेत. या वेबसाइटव्यतिरिक्त वाह रे वाह (www.vahrehvah.com), तरला दलाल डॉट कॉम (www.tarladalal.com/recipes-for-maharashtrian), इंडियामार्कस डॉट कॉम (http://www.indiamarks.com/10-most-popular-maharashtrian-dishes/), वदनी कवळ घेता ( www.vadanikavalgheta.com), यासारख्या अनेक वेबसाईटवर खवय्यांची रसतृप्ती करणाऱ्या चविष्ट, खमंग पाककृतींचा खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
---------------------------------------------
संजीव कपूर
http://www.sanjeevkapoor.com/Maharashtrian-Cuisine.aspx

पाककृती तयार करण्याला मोठ्या प्रमाणावर ग्लॅमर आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यात प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचं विशेष योगदान आहे. छोट्या पडद्यावरच्या खाना-खजाना या कार्यक्रमानं संजीवजींना घराघरात पोहोचवलं आणि तमाम गृहिणींच्या गळ्यातला ते ताईत झाले. अनेक वर्षे दूरचित्रवाणी वाहिनीवर पाककृतीचा कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांनी स्वत:ची स्वतंत्र वेबसाइटही सुरू केली तीच ही वेबसाइट. भारतातल्या पारंपरिक रेसिपींसह देशविदेशातल्या पाककृती हे या साइटचं वैशिष्ट्य. इंग्रजीमधून ही साइट असल्यामुळे भारताबाहेरच्या नागरिकांनाही ही उपयुक्त आहे. पाकृतींच्या तयार करण्याचे व्हीडिओसुद्धा या साइटवर पाहायला मिळतात. उत्तम दर्जाच्या छायाचित्रांमुळं ही साइट लक्ष वेधून घेते.
-----------------------------

ब्लॉगर्स डॉट कॉम

मराठीफूडफंडा
marathifoodfunda.blogspot.com

पूर्वा सावंत हा ब्लाॅग चालवतात. भरपूर पदार्थ यावर आहेत. छायाचित्रांसह पाककृतीची प्रत्येक पायरी सहज समजावून सांगितलेली आहे. तसंच अनेक महत्त्वाच्या टिप्सही आहेत. मुलांचा डबा, पक्वान्नं, सात्त्विक पदार्थ, कोशिंबिरी इत्यािद अनेक पदार्थ यात वर्गवारीने असल्याने शोधायलाही सोपे जाते.
बकासूर
bakasoor.blogspot.com

अमेरिकास्थित शाल्मली हा ब्लाॅग चालवतात. भरपूर पदार्थ यात आहेत. आई व आजीकडून शिकलेल्या पाककृती प्रामुख्याने यात आहेत. त्यामुळे त्या पारंपरिक आहेत. पाककृती इंग्रजीत आहेत.
देसीढाबा
desidhabba.blogspot.com

अमेरिकास्थित अश्विनी हा ब्लाॅग चालवतात. त्यांच्या मुलांना त्यांचा स्वयंपाक खूप आवडतो, ही मोठी पावतीच म्हणायला हवी. या ब्लाॅगवर चटण्या, लोणची, नाश्ता, पक्वान्नं इत्यािद प्रकार आहेत. पाककृती इंग्रजीतून आहेत. सोबत चांगली छायाचित्रेही आहेतच.
वन हाॅट स्टव्ह
http://onehotstove.blogspot.in/p/z.html

नूपुर हा ब्लाॅग चालवतात. मराठी पदार्थांची Aपासून Zपर्यंत यादी यात आहे. म्हणजे A for amti! शिवाय फक्त यात पाककृती नुपूर यांच्या नसून त्यांनी इतर पुस्तकांमधून, नामोल्लेखासह, घेतलेल्या आहेत. पाककृती इंग्रजीत आहेत.
पोटपूजा
http://pot-puja.blogspot.in/

गीतांजली हा पोटपूजा नावाचा ब्लाॅग चालवतात. खूप सारे पदार्थ यात नाहीत, पाककृती सोप्या आहेत. सहज करता येण्याजोग्या आहेत. सोबत छायाचित्रंही आहेत, परंतु ती व्यावसाियक कॅमेऱ्याने काढलेली वाटत नाहीत.
मालविका
http://malavikaskitchen.blogspot.com

मूळ भारतीय, परंतु सध्या अमेरिकास्थित मालविका हा ब्लाॅग चालवतात. फक्त पाककृती असे या ब्लाॅगचे स्वरूप नाही, तर त्यासोबत आठवणी आणि गमतीजमतींचा खजिनाही आहे. सोबत उत्तम छायाचित्रेही आहेतच.
चकली
http://chakali.blogspot.in

वैदेही भावे हा ब्लाॅग चालवतात. त्यात प्रादेशिक, उत्सवानुसार, साेप्या, गोड, मुलांसाठी, इ. वैविध्य आहे. आपल्याला हवे त्यानुसार पाककृती शोधता येतात. कृती व तयार पदार्थांची छायाचित्रे असल्याने ब्लाॅग वाचून पदार्थ करणे सोपे अाहे.
अन्न हे पूर्णब्रह्म
shecooksathome.blogspot.com

सायली राजाध्यक्ष हा ब्लाॅग चालवतात. प्रवाही भाषेत, गप्पा मारल्यासारखं त्या प्रथम एका पदार्थाबद्दल लिहितात व मग त्याची कृती देतात. कृतीच्या प्रत्येक पायरीसह तयार पदार्थाची छायाचित्रंही असतात. यात भात, पोळ्या, उसळ, भाज्या, पराठे, मांसाहारी इत्यादि अनेक वर्गवारी आहे, त्यामुळे पदार्थ शोधण्यास सोपे जाते.

मराठी खाद्यसंस्कृती
http://marathikhadyasanskruti.blogspot.com

हा ब्लाॅग राजेंद्र प्रभुणे चालवतात. खाद्यपदार्थ, त्यांचे घटक, त्याचा शरीरावर होणारा परिणाम, शास्त्रीय माहिती असं सगळं तपशीलवार या ब्लाॅगवर वाचायला मिळतं. यात महाराष्ट्रीय पदार्थच आहेत, परंतु, पाककृती इंग्रजीतून आहेत. महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींच्या गरजा साधारण ओळखून त्यानुसार पथ्याची माहिती आहे. उदा. बाळंतिणीसाठी. व्यायाम, वेळ वर्गीकरण, वगैरे अशीही माहिती आहे.
बातम्या आणखी आहेत...