आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रश्मी पुराणिक, नवी दिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणात महिलांचा टक्का वाढत असला तरी राजकारणातल्या घडामोडींचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांची संख्या नाममात्रच आहे. टीव्हीवर तर मोजक्याच महिला पॉलिटिकल रिपोर्टर आहेत. देशाच्या राजधानीतून राजकारणातील घडामोडी टिपण्याचा अनुभव म्हणूनच महत्त्वाचा.
महिला पत्रकार म्हटलं की, आरोग्य, शिक्षण, कला-संस्कृती, महिला जगत, चित्रपट-मनोरंजन असे टिपिकल विषयच डोळ्यासमोर येतात. त्यामुळे, दिल्लीत राहून पॉलिटिकल बीट सांभाळणारी मराठी पत्रकार मुलगी ही कुतूहलाची आिण भुवया उंचावायला लावणारी गोष्ट. त्यातूनही मतदान आिण प्रचारापुरताच महिलांचा राजकारणाशी संबंध असतो या ठोकळेबाज विचारांमुळे राजकीय वार्तांकन करणाऱ्या महिला उत्सुकतेपेक्षा उपहासाचा, चेष्टेचा विषय ठरतात. मात्र, महिला पत्रकारांनी केलेलं राजकीय वार्तांकनही अभ्यासपूर्ण आिण चौफेर असू शकतं, याचं उदाहरण घालून दिलं आहे रश्मी पुराणिक या पत्रकार मैत्रिणीनं.

रश्मी मूळची मुंबईची. आई बँकेत तर वडील महापालिकेत नोकरीला. घरी पत्रकारितेचा कुठलाही वारसा नाही. सुरुवातीला ग्लॅमर म्हणून आिण नंतर आवड निर्माण झालेल्या रश्मीनं याच क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. २००५ मध्ये ईटीव्हीच्या माध्यमातून तिला पहिल्यांदा संधी मिळाली. मुंबईला पोस्टिंग मिळाल्यानंतर तिच्याकडे न्यायालय, गुन्हे, सांस्कृतिक बीट सोपवले गेले. मात्र, विविध वृत्तपत्रांसाठी काम करणाऱ्या राही भिडे, श्रुती गणपत्ये, मृणालिनी नानिवडेकर, शुभांगी खापरे यांसारख्या राजकीय बीट हाताळणाऱ्या महिला तिला खुणावत होत्या. तिनेही दिल्लीला पॉलिटिकल बीटवर रिपोर्टिंग करण्याची मागणी केली. सुरुवातीला तिला ती संधी नाकारण्यात आली. मात्र, काही वर्षं दुसऱ्या चॅनलला काम केल्यानंतर परत ईटीव्हीमध्ये आल्यावर तिला दिल्लीला ते बीट मिळालं. आिण इलेक्ट्रॉनिक मीडियातली दिल्लीत राजकीय वार्तांकन करणारी ती पहिली मराठी मुलगी ठरली. सध्या ती मुंबईत एबीपी माझा या वृत्तवाहिनीत असोसिएट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ हे बीट तिच्याकडे आहेत.

हट्टानं मागून घेतलेल्या बीटवरचा प्रवास सोपा नव्हताच असं सांगताना रश्मी म्हणते, आता माझा राजकीय वार्ताहर म्हणून चांगला जम बसला आहे; पण सुरुवातीला दिल्लीत मात्र खूप अवघड गेलं. इतर चॅनलच्या प्रतिस्पर्ध्यांनी मला गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जसं खच्चीकरण करणारी मंडळी भेटली तशी उमेद वाढवणारी माणसंही जोडली गेली. पॉलिटिकल बीटचं कव्हरेज, चॅनलच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा बातमीचा अँगल, बातमीमागची बातमी, या सगळ्या गोष्टी निरीक्षणातून शिकले. मुळातच पॉलिटिकल बीटचं स्वत:चं असं एक राजकारण असतं, आिण त्याचा एकदा तुम्हाला अंदाज आला की मग पुढच्या गोष्टी सोप्या होऊन जातात,’ असं रश्मीचं मत आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अपडेटेड राहणं किती गरजेचं आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यातून पॉलिटिकल बीट म्हणजे तर नवनवीन घटना, पक्षांतर्गत उलथापालथी, राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांमधलं राजकारण आिण इतर तमाम बाबींबाबत सावध राहावं लागतं. ‘बूम धरून कॅमेऱ्यासमोर बाइट देता येतात, मोठे नेते, सेलिब्रिटींच्या मुलाखती घेता येतात म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे अनेकांचा ओढा असतो. पण या झगमगाटामागे असलेली पत्रकारांची मेहनत, समयसूचकता, याबद्दल फारसं बोललं जात नाही, याबद्दल रश्मी नाराजी व्यक्त करते. अवांतर वाचन, िवचारांची पक्की बैठक, संबंधित राजकीय घटनेचा इतिहास, राज्य तसंच स्थानिक पातळीवरच्या पक्षीय राजकारणाचे दूरगामी परिणाम, नेता-कार्यकर्त्यांचे आडाखे-डावपेच याचा अभ्यास असल्याशिवाय राजकीय वार्तांकन करणं अवघड आहे.
आजकाल दिवसभरातल्या मुख्य घडामोडींवर विशेष तज्ज्ञांना घेऊन चर्चात्मक कार्यक्रम दररोज प्रसारित केले जातात. पण तरीही घटना घडते त्या वेळी बाइट किंवा फोनो देताना पत्रकारानं त्या बातमीचे-घटनेचे काही मागचे -पुढचे संदर्भ थोडक्यात सांगितले तर त्याचं वेगळं महत्त्व असतं. त्यासाठीच्या तयारीकरताही रश्मी विशेष मेहनत घेते, ‘यासाठी अिधकाधिक लोकांना-नेत्यांना-कार्यकर्त्यांना मी भेटते’. सोर्सेस आिण परसेप्शन या दोन गोष्टी या क्षेत्रातल्या वार्तांकनासाठी आवश्यक आहेत, असं रश्मीला वाटतं. शरद पवार यांची २०१२च्या महानगरपालिका निवडणुकांदरम्यान घेतलेली मुलाखत हा तिच्या करिअरमधला अिवस्मरणीय क्षण.
पवारांसोबतच्या मुलाखतीनंतर औपचारिक बोलण्यांदरम्यान, मराठी मुलगी करिअरसाठी म्हणून दिल्लीला एकटी राहते हे कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत पवारांनी केलेलं कौतुक उमेद वाढवून गेल्याची आठवण रश्मी सांगते.

हल्ली यशस्वी झालेला प्रत्येक जण आपल्या यशामागं एखादा गॉडफादर असल्याचं आवर्जून सांगतो. रश्मी याला अपवाद आहे. जे करायचं आहे, जे मिळवायचं आहे ते मी माझ्या मेहनतीच्या, कष्टाच्या आधारावर मिळवलं आहे. त्याला आई-वडील, सहकाऱ्यांचा, वरिष्ठांचा पाठिंबा जरूर आहे. पण या क्षेत्रात माझा कुणीच गॉडफादर नाही. ‘किंबहुना करिअर करू इच्छिणाऱ्या कुठल्याच मुलीला तो नसावा, कारण गॉडफादर असणं हे दीर्घकाळात फारसं फायद्याचं ठरत नाही,’ असं रश्मीला वाटतं. धडाडी आिण हिमतीने राजकीय वार्तांकनात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या नव्या पिढीतल्या रश्मीच्या या मतावर, नव्यानं या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मैत्रिणींनी विचार करायला हवा हे नक्की.

rashmipuranik27@gmail.com
vandana.d@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...