आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करा नियोजन तणावाचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानसिक तणावाची कारणे
आयुष्यातील अनिश्चितता, आर्थिक अडचणी, कामाचे वाढलेले तास, नातेसंबंधातील दुरावा, इतरांशी तुलना करणे, अवास्तव अपेक्षा करणे, नकारात्मक विचार या सर्व कारणांमुळे मानसिक तणावाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. अभ्यासाचा ताण, तीव्र झालेली स्पर्धा, आईवडिलांच्या अपेक्षा, मैदानी खेळांचा अभाव या सर्व कारणांमुळे विद्यार्थी वर्गसुद्धा तणावाखाली वावरताना दिसतो. त्याचप्रमाणे विविध आजार, आर्थिक अडचणी, दुरावलेली नाती या कारणांमुळे वृद्ध व्यक्तीसुद्धा मानसिक तणावाचे शिकार होतात.

मानसिक तणावाचे दुष्परिणाम
तणावामुळे शरीरावर अनेक विपरीत परिणाम होऊन शारीरिक व मानसिक आजार उद्भवू शकतात. तणावजन्य परिस्थितीत अधिवक्र ग्रंथीमधून कॉट्रिसॉल नावाचे संप्रेरक स्रवते. या संप्रेरकामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊन शरीर अनेक आजारांना बळी पडू शकते.
तणावामुळे एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, निर्णयक्षमता घटणे, चिंता करणे, नकारात्मक विचार करणे अशी बुद्धीशी संबंधित लक्षणे उद्भवू शकतात. भावनात्मक पातळीवरसुद्धा तणावाचे दुष्परिणाम दिसून येतात. रागीटपणा, लहरीपणा, एकटेपणा, नैराश्य अशा अनेक प्रकारांनी मानसिक तणाव व्यक्त होऊ शकतो. याशिवाय तणावामुळे निद्रानाश, पोटाशी संबंधित विकार, स्थौल्य, हार्मोनल इम्बॅलन्स असे विकारसुद्धा निर्माण होऊ शकतात.
नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार मानसिक तणावाचे आणखी चिंताजनक परिणाम सामोरे आले पाहिजे. यानुसार सतत मानसिक तणावामुळे हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात, उच्च रक्तदाब असे आजार होण्याची शक्यता सामान्य व्यक्तीपेक्षा अनेक पटींनी जास्त असते. अशा व्यक्तींमध्ये वृद्धावस्थेची लक्षणे दिसून येतात.
शिरोधारा : तणाव कमी करण्यासाठी शिरोधारा थेरपी अत्यंत उपयुक्त आहे. डोक्यावर विशिष्ट पद्धतीने औषधी तेलाची धारा सोडल्याने डोके अगदी शांत होऊन लगेच तणावमुक्तीचा आनंद घेता येतो.
औषधी : आयुर्वेदातील ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा, तगार यासारख्या वनस्पती तणावमुक्तीसाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध झाल्या आहेत.

तणाव नियंत्रणाचे उपाय
ओंकाराचा जप : विशिष्ट लयीत ओंकाराचा जप केल्यास मेंदूमध्ये अल्फा लहरी निर्माण होतात. योगमुद्रा, शवासन, समकायासन, भुजंगासन, धनुरासन या प्रकारच्या आसनांमुळे मेंदूला रक्ताचा पुरवठा होतो. त्यामुळे मेंदूची क्षमता वाढून तणाव कमी करण्यास मदत होते.