आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर: विषय काळजीपूर्वक निवडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा इतर पदवी कोर्सेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपण कोणते विषय निवडावेत किंवा कोणत्या विषयांचे पर्याय उपलब्ध आहेत, याची माहिती करून घेणे गरजेचे आहे. अनेकदा विषय निवडत असताना योग्य माहिती नसल्यामुळे फॉर्म भरण्याच्या घाईत विद्यार्थी उपलब्ध असलेल्या विषयांबद्दल विचार करत नाहीत, त्यामुळे भविष्यात नोकरी किंवा इतर शिक्षणासाठी अडचणी येऊ शकतात.
बॅचलर ऑफ आर्ट्स या पदवी कोर्समध्ये अनेक पर्यायी विषय असतात. विद्यार्थ्याने अनिवार्य विषयांव्यतिरिक्त पर्यायी विषयांपैकी तीन विषय निवडायचे असतात. आपल्याला केवळ मार्क मिळवायचे आहेत, असा साधा-सोपा विचार न करता या विषयाचा आपल्याला भविष्यात काय फायदा होईल, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. (साधारणपणे पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात म्हणजेच टीवायबीएमध्ये पर्यायी विषयांपैकी तीन विषयांचे प्रत्येकी दोन पेपर किंवा त्यातल्या दोन विषयांचे प्रत्येकी तीन पेपर अथवा फक्त एका विषयावर सहा पेपर, असे तीन पर्याय असतात.)

आर्ट्समध्ये भाषांचे अनेक पर्याय दिले गेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना भाषेची आवड आहे, त्यांनी त्या भाषेच्या साहित्यामध्ये बीएची पदवी मिळवावी. शिवाय इतर काही पर्यायी विषय आहेत. उदा. इतिहास, प्राचीन भारतीय संस्कृती, गणित, संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल तसेच ट्रॅव्हल अँड टूरिझम (हा एक व्यावसायिक विषय आहे). या सर्व विषयांपैकी एफवाय बीए म्हणजे डिग्री कोर्सच्या प्रथम वर्षात निवडलेल्या तीन पर्यायी विषयांपैकीच तीन किंवा दोन किंवा एक विषय टीवाय बीएमध्ये निवडायचे असतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजमध्ये पर्यायी विषय मिळणे कठीण आहे, म्हणूनच कोणत्याही कॉलेजचा प्रवेश अर्ज भरत असताना त्या कॉलेजमध्ये आपल्याला हवा असलेला पर्यायी विषय आहे की नाही, हे पाहिले पाहिजे.
सायन्समधून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बॉटनी, झूऑलॉजी, लाइफ सायन्स, बायोटेक्नॉलोजी, मेडिकल लॅब टेक्नोलोजी, स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर सायन्स हे पर्यायी विषय उपलब्ध आहेत. टीवाय बीएस्सी म्हणजे बीएस्सीच्या तिसर्‍या वर्षात या विषयांपैकी एक किंवा दोन किंवा तीनही विषय घेता येतात. आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांनी त्यानुसार विषय निवडावेत.
सायन्समधून बारावी केलेल्या विद्यार्थ्यांसमोर डिग्री व डिप्लोमाचा पर्याय असतो. या विद्यार्थ्यांपुढे बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, स्पीच थेरेपी, र्नसिंग, डेन्टिस्ट्री, बीफार्मा, बीएस्सी ऑप्टोमेट्री, बीएस्सी फिजियोथेरेपी, एमबीबीएस, बीई (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग - ज्यात सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, टेलिकम्युनिकेशन असे विविध विभाग आहेत)

बारावीपर्यंत कॉमर्स घेणार्‍या विद्यार्थ्यांना बारावीनंतर बॅकिंग, इन्श्युरन्स, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकरिता पदवी कोर्सेस आहेत आणि ज्यांना बीकॉम करायचे असेल त्यांना अकाउंट्स आणि मॅनेजमेंट असे दोन पर्यायी विषय आहेत. बी.कॉमच्या तिसर्‍या वर्षात एका विषयाचे सहा पेपर नसून सहा विषय अनिवार्य आहेत. बर्‍याचदा बी.कॉमचे विद्यार्थी सीए किंवा सीएसलाही प्रवेश घेऊ शकतात.

० बारावीनंतर परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी इंटरनेटद्वारे माहिती मिळवावी, विविध वृत्तपत्रांमधील जाहिराती पाहाव्यात.
० अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या देशांच्या वकिलातीत म्हणजेच कॉन्स्युलेटमध्ये जाऊन चौकशी करावी.
० तसेच शासकीय महाविद्यालये, खासगी क्लासेसमध्ये, तज्ज्ञ शिक्षकांकडून माहिती मिळवावी.

बारावीपर्यंत ज्या विद्यार्थ्याने एमसीव्हीसी (मिनिमम कम्पिटन्सी व्होकेशनल कोर्स)चे विषय निवडले असतील ते विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून म्हणजेच यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी सारख्या संस्थांमधून पदवी व पदविका मिळवू शकतात.

bhakttiddesai@gmail.com