आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी नवी पुस्तके वापरताच आली नाहीत तरीही इंजिनिअर बनणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या गुरूवारी धनंजयच्या डोळयातील अश्रू थांबत नव्हते. आयआयटीचा निकाल आला होता. पण सर्व्हर हळू चालला होता आणि मुलांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. धनंजयही यात सामील होता. जापर्यंत त्याची निवड होत नव्हती तोपर्यंत त्याला खात्री वाटत नव्हती. पण निकाल समजताच त्याच्या डोळयातून अश्रूधारा वाहू लागल्या. तो अगदी हमसून हमसून रडू लागला. जे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याने आणि त्याच्या आईवडिलांनी सगळी ताकद पणाला लावली होती,ते लक्ष्य पूर्ण झाले होते. पण डोळयांचा अजूनही नशिबावर विश्वासच बसेना. जो कधी नवीन पुस्तकही वापरू शकला नाही, खासगी शाळेत गेला नाही, उपाशी पोटी ज्याने अनेक रात्री अभ्यास केला, ज्याला आयआयटीबद्दलही फारशी पूर्वकल्पना नव्हती, तो इतक्या चांगल्या रँकिंगमध्ये प्रवेश परीक्षा पास करू शकतो यावर कोणाचाच विश्वास बसेना. धनंजयची निरक्षर आई तर फोन वर पुन्हा पुहा हाच प्रश्न विचारत होती की,याचा अर्थ काय? सर्व सुविधा असलेल्या मोठया शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचे जे स्वप्न असते ते स्वप्न धनंजयसारख्या गरीब मुलाने पूर्ण करून दाखविले होते. जुने कष्टाचे दिवस आठवून त्याच्या डोळयातून पुन्हा पुन्हा अश्रू येत होते आणि हे अश्रू सावरण्याचा तो प्रयत्न करत होता हा यशाचा पहिला टप्पा आहे, हे त्याला माहीत आहे म्हणूनच हे लाखमोलाचे अश्रू त्याला गमवायचे नाहीत. हे अश्रू त्याच्या जीवनाचे प्रेरणास्थान आहे.
बिहारच्या समस्तीपूर जिल्हयातील पटोरी गावात धनंजयचे वडील शशिकांत महातो राहतात. त्याच्याकडे न पिढीजात जमीन होती ना शिक्षण. गावात माेलमजुरी करून ते पोट भरत होते. पण जेव्हा त्यांना सहा मुले झाली तेव्हा मात्र कमाई कमी पडू लागली. ते गुजरातेत सुरतला रवाना गेले. तेथे कापड गरणीत काम करू लागले. मुलांसाठी जास्त पैसे पाठवता यावेत यासाठी ते दोन शिफ्टमध्ये काम करू लागले. उत्पन्न वाढले पण काही वर्षानंतर अविरत कष्टाने ते इतके थकले की सतत आजारी पडू लागले. त्याना काम करणेही कठीण झाले. ते चोवीस तास कापसाच्या सान्निध्यात असत आणि उडणारे कापसाचे तंतू त्यांच्या फुप्फुसात जात. शेवटी त्यांची बिघडलेली प्रकृती पाहून मालकाने त्यांना काम सोडण्यास सांिगतले. शशिकांतने बऱ्याच विनवण्या केल्या, मुलांच्या जबाबदारीबद्दल सािगतले . शेवटी मालकाला दया आली. त्याने दहा हजार रूपये दिले आणि गावाकडे पाठवून दिले. आई रेणुकादेवी हिची फार इच्छा होती की मुलानी खूप शिकावे . ती स्वत:ही कधी शाळेत गेली नव्हती पण मुलांना शाळेत सकाळी वेळेवर पाठवायची. गावातील त्या सरकारी शाळेत चांगले शिक्षण मिळत नव्हते. पण दुसरा काही उपायही नव्हता.

धनंजय सहावीत असताना त्याचे वडील सुरतवरून परत आले. मजुरी करणे त्यांना आता शक्य नव्हते. मिळालेल्या दहा हजारातून त्यांनी दुकान सुरू केले. दुकान इतके लहान होते की त बाहेरून दिसतही नव्हते. पण धनंजयचे वडिल दिवसभर यात ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेले असायचे. धनंजय बरीच मेहनत घेत हाेता. पण त्याला नवीन पुस्तके खरेदी करण्याइतकेही पैसे कधी मिळाले नाहीत. काेणाकडून तरी पुस्तके उसनी घेऊन त्याला आपला अभ्या पूर्ण करावा लागत असे. ज्या दवशी दुकानात विक्री होत नसे, त्या दिवशी भुकेल्या पोटी झोपण्याची वेळ येत असे. मुलांची भूक पाहून रेणुकादेवीचा आत्मा तळमळत असे. पण तिच्या हातात काहीच नव्हते. ती मुलांना एकच समजवायची की, यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण. आपल्या आईच्या मनाची तळमळ धनंजयला लहापणीच समजली होती. तो जेव्हा दहावीत गेला तेव्हा वडील फारच आजारी पडू लागले. एकट्या आईला दुकनात मदत करण्यासाठी त्याला दुकानवरही रहावे लागू लागले. तरीही तो दहावी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षणाचे आव्हान त्याच्यासमोर होतेच. यादरम्यान धनंजयला त्याच्या शिक्षकांनी ‘सुपर ३०’ बद्दल सांिगतले. टेस्ट देऊन प्रवेश घेता येईल, असेही सांिगतले. तेव्हा फीचे ५० रूपये जमा करण्याच्या कामी धनंजय लागला.

तीन चार दिवसात दुकानातून कसे बसे पैसे वाचवून तो विनातिकीट ट्रेनने पाटण्याला आला. मला भेटला आणि या संस्थेचा अविभाज्य भाग बनला. गेल्या दोन वर्षातील आपल्या मेहनतीने त्याने सर्वांचे मन जिंकले. प्रश्न सोडविण्यात तो अग्रेसर रहात असे. तसेच आपल्या मित्रांनही तो बरीच मदत करायचा. कमी वयात इतक्या संघर्षानंतर त्याला जे यश मिळाले ते पाहून त्याच्या डोळयातीज अश्रू थांबेचनात. मला भेटताना जे कपडे त्याने घातले होते तेच कपडे त्याने आजही घातले होते. कारण दोन वर्षापासून तो एकच कपडा जोड वापरत होता. हे एेकून माझा तर विश्वासच बसेना. निेकाल लागल्यानंतर त्यांच्या पालकांनी मला जे भरभरून धन्यवाद दिले ते माझ्या दृष्टीने प्रेरणादायीच होते. त्यामुळे दरवर्षी मी याच दिवसाची वाट पाहात असतो.

आनंद कुमार, संस्थापक, ‘सुपर’ ३०
बातम्या आणखी आहेत...