Home | Magazine | Divya Education | success story of businessman arun pudur

गॅरेजपासून प्रारंभ, मायक्रोसॉफ्टशी घेतली टक्कर

दिव्य मराठी | Update - Dec 28, 2015, 03:00 AM IST

आंत्रप्रेन्योरशिपच्या वाटेवर अरुण जेव्हा निघाले तेव्हा ते केवळ १३ वर्षांच्या कोवळ्या वयातच होते.

 • success story of businessman arun pudur
  कंपनी : सेलफ्रेम
  संस्थापक : अरुण पुदुर
  काही विशेष : वर्ल्ड प्रोसेसर बनविणारी जगातील दुसरी सर्वाधिक लोकप्रिय कंपनी उभी केली.

  आंत्रप्रेन्योरशिपच्या वाटेवर अरुण जेव्हा निघाले तेव्हा ते केवळ १३ वर्षांच्या कोवळ्या वयातच होते. तेव्हा त्यांना दुकानावर काम करणाऱ्या एका मुलासाठी काही हजार रुपये देऊन एका गॅरेजची सुरुवात केली. काही महिन्यातच तो मुलगा गॅरेज सोडून निघून गेला तेव्हा त्यांनी स्वत:च दुरुस्तीचे काम शिकून घेतले व गॅरेज चालवले. या दरम्यानच त्यांच्या अनुभवांनी त्यांना म्हणजे अरुणला आंत्रप्रेन्योरशिपची ट्रेनिंगच मिळाली. मग मी इथूनच सेल्स, मार्केटिंग, कस्टमर हंॅडलिंग, समस्या सोडवणे, ह्युमन रिसोर्स आणि वित्त व्यवस्था करणे हेदेखील शिकून घेतले. गॅरेज चालवणे आर्थिक अपरिहार्यता नव्हती, पण आपल्या छंदाखातिर त्यांनी यास कॉलेजच्या दिवसांपर्यंत चालवले. अरुण याबाबत सांगतात.

  तंत्रज्ञानात पहिले पाऊल
  महाविद्यालय पूर्ण केल्यानंतर अरुण यांनी एक टेक्नाॅलॉजी कंपनीत नाेकरी केली. पण कामातून समाधान न मिळाल्याने त्यांनी हा जॉब एका वर्षातच सोडून दिला. काही दिवसानंतरच अरुण यांनी आपली टेक्नॉलॉजी कंपनी सेलफ्रेमची सुरुवात बेंगळुरूत केली. त्यांनी ठरविले होते की, आपल्या कंपनीला पश्चिमी मल्टिनॅशनल्सच्या बंॅक अंॅड ऑपरेशन्स सांभाळणाऱ्या आयटी कंपन्यांसारखे बनवायचे आणि काही इनोव्हेटिव्ह करायचे होते. ही जिद्द घेऊन त्यांनी आपले पहिले उत्पादन सेलफ्रेम ऑफिस लांॅच केले आणि मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस पॅकेजवरच हल्ला चढवला.

  दिग्गजांना टक्कर देण्याचे आव्हान
  आयटी क्षेत्रात मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गजाला व्यावसायिक रूपात आव्हान देणारी कंपनी सेलफ्रेमची सुरुवात सोपी नव्हतीच. आपल्या मोनोपॉली ताकदीचा वापर करून मायक्रोसॉफ्टने हरतऱ्हेने या कंपनीला रोखण्याचे प्रयत्न केले. पण अरुण यांची सेलफ्रेम कंपनी पाय रोवून उभी राहिली. यासाठी त्यांनी संपूर्ण प्रयत्न केले जेणेकरून डेल, एचपी आणि आयबीएमसारख्या मूळ उपकरणे बनवणाऱ्या निर्मात्यांनी यांचे उत्पादन खरेदी करून आपल्या संगणकात वापरावे पण प्री-लोड त्यांना करता येऊ नये, याची काळजीही अरुण यांनी घेतली. त्यांच्यासमोर दुसरे मोठे आव्हान होते ते फंडिंग वा आर्थिक निधी जमवण्याचे.

  छोटे समाधान मोठा पल्ला वा यश
  समस्यांपुढे हार न मानता अरुण यांनी कंपनीला उत्तम व्यवसाय करण्यासाठी आपल्या महसुलातून ४० टक्के भाग देण्याचा निर्णय घेतला. व्यवसायास केंद्र सरकारच्या कंपन्यांप्रमाणे बनविले. त्यांनी आपल्या ग्राहकांना विश्वास दिला. त्यांच्या उत्पादनाच्या वापराने तंत्रज्ञानाची, त्यांच्या उपकरणाची किंमत आर्धीच होईल. अरुण यांनी केलेल्या या प्रयत्नांचा परिणाम असा झाला की, आज मायक्राेसॉफ्टनंतर सेलफ्रेम वर्ल्ड प्रोसेसर तयार करणारी जगातील दुसरी सर्वात मोठ्या कंपनीचा किताब त्यांनी पटकावला.

Trending