आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण वयातील आत्महत्या निश्चित टाळता येतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जा गतिक पातळीवर बघता, मागील 45 वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात 60 टक्के वाढ झाली आहे. वय वर्षे 15-44 यात आत्महत्या हे मृत्यूच्या प्रमुख तीन कारणांमध्ये आहे. भारतातदेखील तरुणांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणार्‍यांत 40 टक्के लोक 15 ते 30 वर्षे या वयोगटातील आहेत. यात नुसता प्रयत्न करणार्‍यांची संख्या कितीतरी जास्त आहे. दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण एक भयानक स्वरूप घेत आहे. हे जर का थांबवायचे असेल तर आपण सर्वांना या संदर्भांत काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

तरुण तडकाफडकी आत्महत्येस प्रवृत्त का होतात 20 टक्क्यांहून कमी लोक तडकाफडकी आत्महत्या करतात. उरलेले 80 टक्के मात्र बराच काळ अशा विचारांशी झुंज देत असतात. सुरुवात होते ते कंटाळवाणे व उदास वाटण्यापासून माझ्या मनासारखे काहीच होत नाही, तर हे आयुष्य जगण्यात काय अर्थ. आधी माझे आयुष्य किती आनंदी होते. आता नुसते दु:ख आहे, देव मला मरण का देत नाही. जर मला अपयश येते तर मग मी का जगू. अशा विचारांना stage-1 म्हणूयात.
अशा विचारांच्या जाळ्यात अडकलेले तरुण अर्धवट हिमतीने काही प्रयत्न करतात. उदा. हाताला ब्लेडने छोटे छोटे कट मारून थांबणे, विषारी औषध एखादा घोट पिणे व लगेचच कोणालातरी सांगून दवाखान्यात येणे. रेल्वे पटरीवर जाणे, पण रेल्वे येण्याआधीच घाबरून वापस येणे. दोन ते चार झोपेच्या गोळया खाणे, अशा अवस्थेत त्यांची पूर्णपणे मनाची तयारी नसते.

सर्व बाजूंनी आपण हताश झाली आहोत व सुटकेचा उपाय दिसतच नाही. असे नेहमीच कष्ट सहन करण्यापेक्षा एकदाच काय तो त्रास होऊ दे. असे टोकाचे विचार आल्यास आपण त्याला २३ँी-्र्र्र म्हणतो. असे तरुण आत्महत्येचा प्रयत्न करतात व कित्येकजण त्यात यशस्वी होतात. -STAGE- मध्ये असलेले तरुण कसे ओळखावेत, अशा अवस्थेतील तरुण नेहमी निराशावादी व टोकाचे विचार करतात. उदा. मी सर्वांना नकोसा झालो आहे. मी जर गेलो तर इतरांचा त्रास कमी होईल., सतत उदास राहणे, जेवण व झोप कमी होणे, जिवाला धोका होईल असे कृत्य सहन करणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 90 टक्के लोक आत्महत्या करण्यापूर्वी कोणाला तरी हे सर्व सांगतात.

आत्महत्येची वृत्ती आढळल्यास काय करावे?
तीव्रता काहीका असेना, आत्महत्येच्या विचारांना कधीही सहजतेने घेऊ नेये अशा व्यक्तींना महानुभूती द्यावी, जेणेकरून त्यांचा एकटेपणा व असाह्यपणा दूर होण्यास मदत मिळते. नातेवाइकाला या गोष्टीची कल्पना द्यावी व त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.

आत्महत्येचे विचार तरुणांत येऊच नयेत यासाठी:
आत्महत्येचा विचार हे हताशपणाची शेवटीची पायरी आहे. त्यासाठी मुलांमध्ये सकारात्मकता रुजली पाहिजे.
* बालसंगोपन व तरुणांना मागदर्शन करताना आपला उद्देश त्यांना अडचणीपासून दूर ठेवणे हा नसून त्यांना अडचणींना तोंड देण्यासाठी सशक्त बनवणे हा असावा. मुलांची अति काळजी करू नये. तसे केल्यास त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे ते आयुष्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यास घाबरतात. त्यामुळे तरुणांना स्वत:चे निर्णय घेण्यास प्रोत्साहित करावे.

*मुलांना शिक्षा करताना त्यांना दोष न देता त्यांच्या कृतीला द्यावा. उदा. तू मूर्ख आहेस असे न म्हणता, तुझी ही कृती मूर्खमाणसाप्रमाणे होती यात ही समज आहे की कृती बदलल्यास दोषही नाहीसा होतो व त्या व्यक्तीमध्ये अपराधीपणाची भावना येत नाही. तरुणांमध्ये तुलना टाळावी, उदा. भाऊ, शेजारी, मित्र यांची तुलना नको. त्याने द्वेष वाढतो. त्यामुळे मुले पालकांपासून दूर जातात. तरुणांना वेळ द्यावा, चर्चा करावी. त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे ते जाणून घ्यावे. - अभ्यासाबरोबरच व्यवहारिक ज्ञान व शारीरिक सशक्तपणे याकडे लक्ष्य देणे आवश्यक आहे. यासर्व गोष्टीमुळे मुलांमध्ये प्रतिकार क्षमता वाढते. वाढता तणाव, शैक्षणिक अपयश, प्रेमभंग होणे, व्यसनाधीनता पालकांच्या वाढत्या अपेक्षांचे ओझे इत्यादी. हे तरुण वयातील आत्महत्येचे एक प्रुमख कारण आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञ यांच्या मदतीने ताणतणाव नियोजन शिकणे, समुपदेशन व गरज पडल्यास औषधोपचाराने असे तणाव दूर करता येतात.

उपचार
बाळ बालरोग शल्यचिकित्सकाकडे 12 ते 24 तासांच्या आत आल्यास सोनोग्राफीद्वारे सलाइन किंवा बेरियम टाकून आतड्यांमधील पीळ आपण 90 टक्के वेळी सोडवू शकतो. परंतु 24 तासांपेक्षा जास्त वेळ झाला असल्यास आतड्यांचे ठोके बंद झाले असल्यास, संडासमधून रक्तस्राव सुरू झाला असल्यास व सोनोग्राफीमध्ये फसलेल्या आतल्या आतड्यांचा रक्तपुरवठा शाबूत नसेल तेव्हा त्वरित शस्त्रक्रिया करून फसलेले आतडे मोकळे करणे अनिवार्य आहे. आतडी काळी पडली असल्यास ती कापून एकमेकांना जोडणे अनिवार्य असते. कधीकधी बाळ उशिरा आल्यास व सोनाग्राफीने पीळ सोडवण्याचा प्रयत्न केल्यास आतड्यांना छिद्र पडण्याची शक्यता असते. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे या आजारामध्ये फारसे हितकारक नसते. कारण भूलेमधील वेळ जेवढा वाढतो, तेवढा बाळाचा धोका वाढतो. तत्पर रोगनिदान व त्वरित उपचार ही या आजारावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे.